Video: समोर पुर दिसत असताना भयानक धाडस करायचचं कशाला? नागपुरात स्कॉर्पिओ पाण्यात बुडाली; प्रवासी वाचले की वाहून गेले काहीच कळेना

नागपूर जिल्ह्यातील केळवद पोलीस स्टेशन अंतर्गत हा प्रकार घडला आहे. पोलिस स्टेशन परिसरात असेलल्या नाल्यात हे वाहन अडकले असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. पुलावरुन पाणी वाहत असताना स्कॉर्पिओच्या ड्रायव्हरने कार पुलावरुन नेली. मात्र, पाण्याचा प्रवाह इतक्या प्रचंड वेगाने वाहत होता की हे वाहन थेट नाल्यात वाहून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगीतले.

Video: समोर पुर दिसत असताना भयानक धाडस करायचचं कशाला? नागपुरात स्कॉर्पिओ पाण्यात बुडाली; प्रवासी वाचले की वाहून गेले काहीच कळेना
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 6:03 PM

नागपूर : कधी कधी वाहन चालकांचे भलतं धाडस सह प्रवाशांच्या जीवावर बेततं असाच काहीसा थरारक प्रकार नागपुरात घडला आहे. समोर पुर दिसत असताना एका वाहनचालकाने पाण्यातुन स्कॉर्पिओ वाहन नेण्याता प्रयत्न केला. याचा थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक स्कॉर्पिओ कार पुराच्या पाण्यात बुडाल्याची दिसत आहे. हे वाहन पुलावरुन वाहत नाल्यात गेले आहे. यात चार ते पाच प्रवासी होते. बचाव पथकाने तातडीने मदत कार्य सुरु केले आहे. मात्र, या वाहनात असलेले प्रवासी वाचले की वाहून गेले काहीच कळेनासे झाले आहे. विदर्भासह नागपुरात मागील तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पुर स्थिती पहायला मिळत आहे.

नागपूर जिल्ह्यातील केळवद पोलीस स्टेशन अंतर्गत हा प्रकार घडला आहे. पोलिस स्टेशन परिसरात असेलल्या नाल्यात हे वाहन अडकले असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. पुलावरुन पाणी वाहत असताना स्कॉर्पिओच्या ड्रायव्हरने कार पुलावरुन नेली. मात्र, पाण्याचा प्रवाह इतक्या प्रचंड वेगाने वाहत होता की हे वाहन थेट नाल्यात वाहून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगीतले.

सतरापूर आणि नांदा गावादरम्यान वाहणाऱ्या नाल्यावरीव पुलावरुन ही स्कॉर्पीओ वाहून गेली आहे. नागपुरात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे नदी, नाले ओव्हरफ्लो झाले असून पुर सदृष्य स्थिती झाली आहे. अशातच नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असताना देखील पुलावरुन वाहन नेण्याचे धाडस स्कॉर्पीओ चालकाने केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगीतले.

या स्कॉर्पिओ मध्ये चार ते पाच लोक बसलेले असताना पुलावरून गाडी काढण्याचा धाडस ड्रायव्हरने केले. मात्र, तेवढ्यात पाण्याचा लोंढा आला आणि पाण्याच्या धक्क्यामुळे पुलावरून स्कॉर्पिओ नाल्याच्या प्रवाहात वाहत गेली.

सध्या पुलापासून काही अंतरावर स्कॉर्पिओ पाण्यात अडकलेली दिसत आहे. त्यामध्ये बसलेले प्रवासी वाहून गेले आहेत की अजूनही स्कॉर्पिओ मध्ये आहेत हे स्पष्ट नाही. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.