‘गतिमान नव्हे गतिमंद सरकार,’ सरकारवर टीका करणारा हा माजी राज्यमंत्री कोण?

सरकारला वर्ष झाले. शासन आपल्या दारी आणि इतर उपक्रम राबवत आहेत. कर्जमाफी करू अशी घोषणा करून 5 ते 6 महिने झाले तरी अजून पैसे मिळाले नाही. शेकडो कोटी रुपयांचा चुराडा होत आहे. लोकांचे कैवारी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

'गतिमान नव्हे गतिमंद सरकार,' सरकारवर टीका करणारा हा माजी राज्यमंत्री कोण?
CM EKNATH SHINDE, DCM AJIT PAWAR, DCM DEVENDRA FADNAVIS AND PRAJAKT TANPUREImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Sep 30, 2023 | 11:04 PM

नाशिक : : 29 सप्टेंबर 2023 | नाशिक जिल्हा शरद पवारमय झाला आहे. हा जिल्हा पवार साहेबांवर प्रेम करणारा आहे. आमदार, प्रमुख नेते भाजपसोबत सत्तेत गेले असतील पण सर्वसामान्य माणूस जागचा हललेला नाही. सर्वसामान्य माणूस, शेतकरी कष्टकरी हे आजही पवार साहेबांसोबत आहेत. निवडणूक आयोग हा मोदी आणि भाजपच्या हातातली बाहुली बनला आहे. त्याची आयडिया सरकारला आली असावी, त्यामुळे राष्ट्रवादीचे चिन्ह गेले तरी आम्हाला काही आता नवल वाटणार नाही असा टोला राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी लगावला.

जे एकही नेते सत्तेसाठी तिकडे गेले आहेत त्यामुळे नवीन व्यक्तीला संधी मिळणार आहे. पक्षात नवीन नेते तयार होतील असे ते म्हणाले. सरकार स्वतःला गतिमान सरकार म्हणवून घेत आहे. या सरकारला वर्ष झाले. शासन आपल्या दारी आणि इतर उपक्रम राबवत आहेत. कर्जमाफी करू अशी घोषणा करून 5 ते 6 महिने झाले तरी अजून पैसे मिळाले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारच्या काळातही कर्जमाफी केली होती. अजित दादा यांनी त्यावेळी कोरोना संपल्यावर मदत देऊ म्हटले होते. आम्ही लोकांना पैसे द्यायला सुरुवात केली. पण, या सरकारच्या काळात काहींना केवळ 10 हजार रुपये आलेत. गतिमान म्हणणारे सरकार प्रत्यक्षात गतिमंद सरकार असा टोला प्राजक्त तनपुरे यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

सरकार फक्त घोषणा करत आहे. शेतकऱ्यांना फसवण्याचे काम सरकार करत आहे. शेतकऱ्याला मदत वेळेवर मिळत नाही. ज्या कार्यक्रमांची गरज नाही ते कार्यक्रम घेत हे सरकार फक्त पळत आहे. मोठ्या घोषणा केल्या पण ते पैसे द्यायला सरकारला वेळ नाही. शेकडो कोटी रुपयांचा चुराडा होत आहे, असे ते म्हणाले.

मागच्या काळात अतिवृष्टी झाली. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने आले आणि मदतीची घोषणा केली. त्या लोकांना काही मिळाले? तर काहीच नाही, आपण लोकांचे कैवारी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र काहीच नाही. शासन आपल्या दारी आहे तर घरात जाऊन लोकांना मदत द्या. हा फक्त स्टंटबाजी करण्याचा प्रकार आहे. माणसं जेव्हा सत्तेत असतात तेव्हा जमिनीवर काय चालले आहे कळत नाही, अशी खरमरीत टीका त्यांनी केली.

'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.