ST Bus News : तीन मद्यपींनी एसटी अडवली, चालकासोबत घातला वाद, त्यांची डायलॉगबाजी पाहून प्रवासी हसले

MSRTC News in Marathi : परभणी जिल्ह्यात एक घटना घडली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची चर्चा जोरात सुरु आहे. त्याचबरोबर त्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे लोकांसाठी हा विषय हास्यास्पद झाला आहे.

ST Bus News : तीन मद्यपींनी एसटी अडवली, चालकासोबत घातला वाद, त्यांची डायलॉगबाजी पाहून प्रवासी हसले
MSRTC News in MarathiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 9:10 AM

परभणी : आपण एखाद्या दारुड्याला पाहिलं की लांब पळतो. कारण ते दारुच्या नशेत (Today Parbhani Viral News) काहीही बोलतात, त्याचबरोबर शिवीगाळ करुन भांडण काढतात. त्यामुळे अशा लोकांनापासून चार हात लांब राहिलेलं चांगलं अशी लोकांची भूमिका असते. परभणीत (Parbhani ST News) एक घटना घडली आहे. ती घटना एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी आहे. तीन दारुड्यांनी एक खचाखच लोकांनी भरलेली एसटी रस्त्यात अडवली होती. त्यावेळी त्यांनी केलेली डायलॉगबाजी लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आहे. त्याचबरोबर त्यांनी एसटीच्या (MSRTC News in Marathi) चालकाला दमदाटी केली आहे. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांच्यासाठी हा विषय हास्यास्पद झाला आहे. त्या तिघांच्यावरती फौजदारी कारवाई केली असल्याची माहिती मिळाली आहे.

सरकार आमचे आहे, लोकशाही आमची आहे

त्या तिघांनी ज्यावेळी एसटी अडवली, त्यावेळी त्या एसटीत प्रवासी होते. ते तिघं दारु पिले असल्यामुळे काही लोकांनी त्यांच्याशी चर्चा करणं टाळलं. परंतु एसटी चालक आणि वाहक यांनी त्यांना बाजूला होण्यास सांगितलं. त्यावर तिघांनी “सरकार आमचे आहे, लोकशाही आमची आहे” अशी डायलॉगबाजी सुरु केली. त्यामुळं संपूर्ण एसटीतील प्रवासी पोट धरून हसू लागले. त्यांनी अजून बरीचं कॉमेडी डायलॉगबाजी केली आहे.

हे सुद्धा वाचा

वीस मिनिटं बस रोखून ठेवली

तीन दारुड्यांनी तब्बल वीस मिनिटं बस रोकून धरल्याची घटना परभणीच्या सोनपेठ बस स्थानकात घडली आहे. खचाखच भरलेल्या बसमध्ये मद्यसेवन केलेल्या तीन प्रवाशांनी चालकासोबत चांगलाच वाद घालत बस रोखून धरली होती. शेवटी आगार प्रमुखांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर गाडी पुढील प्रवासासाठी परभणीकडे रवाना करण्यात झाली. मात्र तिघांनी घातलेल्या गोंधळामुळे प्रवाशांना वीस मिनिट नाहक त्रास सहन करावा लागला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.