पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षा प्रवास आता मीटरनुसार, पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडून मीटर डाऊन!

पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्वत: मीटर डाऊन करुन रिक्षा प्रवासाला सुरुवात केली.

पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षा प्रवास आता मीटरनुसार, पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडून मीटर डाऊन!
Follow us
| Updated on: Jan 21, 2021 | 4:52 PM

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात आता रिक्षाचा प्रवास मीटरनुसार होणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्वत: मीटर डाऊन करुन रिक्षा प्रवासाला सुरुवात केली. त्यामुळे आजपासून पिंपरी-चिंचवडकरांना रिक्षा प्रवासासाठी कमी पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. (Rickshaw fares will now be charged per meter)

रिक्षा प्रवासाला आता मीटरनुसार किती पैसे लागणार?

पिंपरी-चिंचवडमध्ये आजपासून रिक्षा प्रवास करायचा झाल्यास,

>> 1 किलोमीटरसाठी दिवसा 18 तर रात्री 23 रुपये

>> 2 किलोमीटरसाठी दिवसा 25 तर रात्री 31 रुपये

>> 3 किलोमीटरला दिवसा 37 तर रात्री 46 रुपये

>> 5 किलोमीटरला दिवसा 62 तर रात्री 77 रुपये

>> 10 किलोमीटरला दिवसा 123 तर रात्री 154 रुपये मोजावे लागणार आहेत.

रिक्षाचालकांकडून होणारी लूट थांबणार

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मिटरशिवाय रिक्षा चालवल्या जातात. अनेकदा रिक्षा चालक प्रवाशांकडून मनमानी भाडं आकारलं जातं. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची मोठी लूट या ठिकाणी सुरु असते. त्याचबरोबर रिक्षा चालकांकडून अनेकदा भाडं नाकारलं जातं, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाचाही सामना करावा लागतो. अशावेळी पिंपरी-चिंचवडमध्ये आता मीटरनुसार रिक्षाचं भाडं आकारलं जाणार असल्यान नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ई-बाईक रेटींग प्रकल्पात पुणेकरांना येणारा खर्च

  • ई-बाईक तुम्हाला महिनाभर भाड्याने घ्यायची झाल्यास साधारण 3 हजार ८०० रुपये लागणार आहे. त्यातमध्ये तुम्ही साधारण 4 हजार किलोमीटरचा प्रवास करु शकणार आहात.
  • आठवडाभराचे भाडे पाहायचे झाल्यास तुम्हाला साधारण 1 हजार 900 रुपये खर्च येणार आहे. त्यात तुम्ही 1 हजार किलोमीटरचा प्रवास करु शकता.
  • प्रत्येक दिवसाचे भाडे पहायचे झाल्यात तुम्हाला 450 रुपये खर्च अपेक्षित आहेत त्यात 150 किलोमीटरचा प्रवास शक्य होणार आहे.
  • तर प्रत्येक तासाला साधारण 100 रुपये लागतील. यात तुम्ही 25 किलमीटर प्रवास करु शकणार आहात.
  • म्हणजे सर्वसाधारणपणे प्रत्येक किलोमीटरसाठी तुम्हाला 4 रुपये भाडे असणार आहे.

संबंधित बातम्या :

पीएमपीएलच्या उत्पन्नात वाढ, तिजोरीत तब्बल 50 लाख जमा

ई-बाईक सेवा देणारं पुणे देशातील पहिलं शहर ठरणार!

Rickshaw fares will now be charged per meter

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.