Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गडचिरोली जिल्ह्यात ट्रॉमा केअर सह सुसज्ज मल्टीस्पेशालिटी रुग्णालयायासाठी तत्वतः मंजुरी, विमानतळ रेल्वे मार्गाचा प्रश्न तातडीने मार्गी लागणार

लष्कराच्या धर्तीवर दिडशे खाटांचे सामान्य रुग्णालय तयार करावे आणि त्यातील पन्नास खाटा या ट्रॉमा केअरसाठी राखीव ठेवाव्यात असे यावेळी निश्चित करण्यात आले. या नव्याने तयार होत असलेल्या रुग्णालयात सिटी स्कॅन, एमाआरआय यासारख्या अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून घ्याव्यात.

गडचिरोली जिल्ह्यात ट्रॉमा केअर सह सुसज्ज मल्टीस्पेशालिटी रुग्णालयायासाठी तत्वतः मंजुरी, विमानतळ रेल्वे मार्गाचा प्रश्न तातडीने मार्गी लागणार
उपमुख्यमंत्री अजित पवारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 7:03 PM

मुंबई : मागास, अदिवासी आणि नक्षलग्रस्त (Naxal-affected) असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पोलीसांवर त्वरित उपचार करता यावेत तसेच स्थानिक आरोग्य सेवेचा दर्जा सुधारावा यासाठी जिल्ह्यात ट्रॉमा केअरसह (Trauma Care) सुसज्ज असे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय तयार करण्याच्या मागणीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी आर्थिक तरतूद करण्यासोबतच तिथे तज्ज्ञ स्टाफच्या नेमणुकीसाठी जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी दिले आहेत. त्यासोबतच जिल्ह्यात जलद येजा करता यावी तसेच कोनसरी लोहखनिज प्रकल्पाला मदत आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी जिल्ह्यात विमानतळ आणि गडचिरोली-कोनसरी या रेल्वे मार्गाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश देखील पवार यांनी या बैठकीत दिले.

यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्यात होणारे नक्षलवाद्यांचे हल्ले आणि त्यात जखमी होणाऱ्या पोलीसांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी जिल्ह्यात सर्व सोयींनी युक्त अशा रुग्णालयाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. याठिकाणी लष्कराच्या धर्तीवर दिडशे खाटांचे सामान्य रुग्णालय तयार करावे आणि त्यातील पन्नास खाटा या ट्रॉमा केअरसाठी राखीव ठेवाव्यात असे यावेळी निश्चित करण्यात आले. या नव्याने तयार होत असलेल्या रुग्णालयात सिटी स्कॅन, एमाआरआय यासारख्या अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून घ्याव्यात. याठिकाणी नेमणूक देतांना डॉक्टरांना विशेष पॅकेज देऊन तज्ञ स्टाफची नेमणूक करण्यासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नमुन त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्यासह इतर तज्ञ लोकांचा समावेश करावा असे निर्देश यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

दोनशे एकर जमिनीवर विमानतळ

गडचिरोली जिल्ह्यातील दळणवळण अधिक गतिमान व्हावे यासाठी जिल्ह्यात सुमारे दोनशे एकर जमिनीवर विमानतळ प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी लागणाऱ्या जमीनीची उपयुक्तता तपासून घेण्यासाठी ही माहिती विमानतळ प्राधिकरणाकडे पाठवावी असे वल्सा नायर यांनी सांगितले. तर, विमानतळ उभारणीसाठी एअरपोर्ट अथॉरिटी कडून शक्यता (फिजीबलीटी) तपासून घेऊन यासाठी लागणारी तांत्रिक पाहणीकरण्यासाठी नागपूर येथून तज्ज्ञ व्यक्ती पाठविण्यात येईल आणि त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल असे असे या बैठकीत निश्चित करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

गडचिरोली-वडसा- कोनसरी रेल्वेमार्गाच्या कामाला गती

गडचिरोली जिल्हातील गडचिरोली- वडसा- कोनसरी हा रेल्वे मार्गाच्या उभारणीला 2015 साली मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली होती. मात्र हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या आणि वित्तीय मान्यता मिळणे अद्याप बाकी होते. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास कोनसरी येथील प्रस्तावित लोहखनिज प्रकल्पाला त्याचा फायदा होईल तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध मिळवून देणे शक्य होईल. त्यामुळे या प्रकल्पाला लवकरात लवकर मंजुरी देण्याची मागणी या बैठकीत करण्यात आले. त्यानुसार या प्रकल्पाबाबत रेल्वेला तात्काळ संमतीपत्र देऊन त्यानंतर सुधारित वित्तीय मान्यतेसाठी हा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर आणून तो संमत करून घ्यावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

नक्षल भागात रोजगार निर्मिती

गडचिरोली ते कोनसरी हा 60 किलोमीटरचा रेल्वेमार्ग तयार होऊन गडचिरोली रेल्वेमार्गाने जोडला गेल्यास हा दुर्गम भाग रेल्वेने जोडला जाईल. तसेच याभागात अनेक उद्योजक आकर्षित होतील आणि रोजगारास चालना मिळेल. नक्षल भागात रोजगार निर्मिती झाल्यास त्याचा फायदा इथला नक्षलवाद कमी होण्यास होईलच पण त्याचबरोबर शासनाच्या महसुलातही वाढ होईल.

– एकनाथ शिंदे, पालकमंत्री, गडचिरोली जिल्हा

'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा.
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात.
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट.
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?.
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण.
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक.
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्.