पुणे : आज राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या जिल्ह्यात तालुक्यात आपली ताकद लावली होती. त्यामध्ये आमदार, खासदार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असते. ग्रामीण भागात या निवडणुकीत मोठा कस लागत असतो. याच सर्व पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील दुपारपर्यन्तच्या आकडेवारीत राष्ट्रवादी कॉँग्रेसने बाजी मारल्याचे चित्र आहे. पुणे जिल्ह्यात 221 पैकी आतापर्यंत 74 ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्वाधिक 46 ग्रामपंचायती तर भाजपकडे 11 ग्रामपंचायती ताब्यात आल्या आहेत. शिवसेना उद्वव बाळासाहेब ठाकरे गटाकडे 6 ग्रामपंचायती तर शिंदे गटाकडे 1 ग्रामपंचायत, काँग्रेसकडे आतापर्यंत 15 ग्रामपंचायती ताब्यात आल्या आहे. यामध्ये महाविकास आघाडीचा बोलबाला पुणे जिल्ह्यात पाहायला मिळत असून ग्रामीण भागात राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे पारडं जड असल्याचे पाहायला मिळत आहे.
मुळशी तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत थेट सरपंच निवडणूकीत तरूणाईचा बोलबाला असून मतदारांनी तरुणाईला अधिक पसंती दिल्याचे चित्र पुण्यातील मुळशी मध्ये आहे.
मतमोजणी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक ग्रामपंचायतीवर बाजी मारली असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे यांनी केला आहे.
ग्रामपंचायतसाठी मतदान झाले. तर पौड येथील सेनापती बापट सभागृहात मतमोजणी करण्यात आली. तहसिलदार अभय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही मतमोजणी पार पडली आहे.
परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतमोजणी परिसरात उमेदवार, प्रतिनिधी तसेच समर्थक यांनी मोठी गर्दी केल्याचे बघायला मिळत आहे.
मतमोजणी नंतर विजयी उमेदवाराच्या समर्थकांनी गुलालाची उधळन करत जल्लोष केला असून यामध्ये राष्ट्रवादीचा बोलबाला पाहायला मिळत आहे.
दासवे : स्वाती नितीन मोरे, आडमाळ : पल्लवी हेमंत पासलकर, मोसे : रसवंता काळुराम पासलकर, माळेगांव : नंदा नामदेव चौधरी, भोडे : राजेंद्र रामभाऊ मारणे