SUSHAMA ANDHARE : ‘कोण आहेत ‘या’ ठाकरे? बडा नेता कुणाला म्हणतात?’, सुषमा अंधारे यांची तोफ कुणावर धडाडली?
भाजपची नीती 'युस अँड थ्रो' आहे. वापर झाला की भाजप त्याला फेकून देते. याचप्रमाणे भाजप जानकर, शेट्टी यांच्यासोबत वागले, खोतांच्या सोबतही तसेच वागले. आता शिंदेंचा वापर संपला आहे, आता त्यांना फेकून देऊन ते दादांना हाताशी धरत आहेत.
पुणे : 7 ऑक्टोबर 2023 | ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांवर टीका केलीय. नांदेड, छत्रपती संभाजी नगरमध्ये जे मृत्यू तांडव सुरू आहे त्यावर आम्ही सरकारला प्रश्न विचारला होता. त्या मुळ मुद्द्यावरून लक्ष वळविण्यासाठी हे असे उपकंत्राटदार मध्ये मध्ये लुडबुड करतात, असा टोला त्यांनी मनसे नेत्यांना लगावलाय. दिल्लीश्वरांच्या वाऱ्या करायच्या होत्या आणि त्यांची मानधरणी करायची होती म्हणून मुख्यमंत्री नागपूरला गेले नाहीत. कोल्हापूर, पुणे नंतर चंद्रकांत पाटील यांना आता कर्नाटकला विस्थापित करतील की कायं? या सगळ्यासाठी ह्या दिल्लीवाऱ्या होत्या, अशी टीकाही त्यांनी केलीय.
pm केअरला फंड कुणी दिला?
चंद्रशेखर बावनकुळेजी आपण जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. तुम्ही अध्यक्ष आहात याचं भान ठेवा. तुम्ही जनाची नाही तर विदर्भाची तरी लाज ठेवा. विदर्भाची लाज ठेवताना हे आठवा की कोविड काळात cm केअर फंड देण्याऐवजी pm केअरला फंड कुणी दिला? तिथं लूट कुणी केली? बॉडी बॅग संदर्भातील कागदपत्रे मी प्रेसमध्ये दाखवली आहेत यावरही अभ्यास करा.
प्रश्न विचारायला बावनकुळेजी जिवंत आहात…
कोविड काळात योगीच्या भागात नदीवर प्रेत तरंगली. गुजरातमध्ये रस्त्यावर प्रेत जाळून स्मशानभूमी केली. आमच्या काळात कोविड असताना रुग्णालयात एवढे रुग्ण दगावले नाहीत. जेवढे आत्ता तीन तीन इंजिन लावलेलं सरकार असताना दगावत आहेत. आम्ही कोविड काळात कायं केलं याचं उत्तर एवढचं आहे, उद्धव ठाकरे यांनी कोविड काळात जे कामं केलं त्यामुळेच त्यांनी कायं कामं केलं हा प्रश्न विचारायला आज बावनकुळेजी जिवंत आहात आणि मी त्याचं उत्तर द्यायला शिल्लक आहे. उद्धव ठाकरे यांच्यामुळं महाराष्ट्र कोविड काळात सुखरूप राहिला, असे त्या म्हणाल्या.
राहुल नार्वेकर हे अध्यक्ष राहण्यास पात्र आहेत का?
निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादीची सुनावणी आहे. मी काही राष्ट्रवादीची प्रवक्ता नाही त्यामुळं मी यावर भाष्य करू इच्छित नाही. जितेंद्र आव्हाड भूमिका मांडतील. परंतु, पक्ष फुटीच्या वादानंतर निवडणूक आयोगाच्या भूमिकेचा आम्ही अनुभव घेतला आहे. 16 आमदार अपात्र होतील की नाही होतील. राष्ट्रवादीला पक्ष चिन्ह मिळेल की नाही मिळेल याहीपेक्षा आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे अध्यक्ष राहण्यास पात्र आहेत का याचा आधी खटला चालला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
कोण आहेत ठाकरे ?
मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी राजसाहेबांच्या नातवाला आपण राजकारणासाठी बोललात तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तुमच्या कानाजवळ डी.जे. वाजवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सुषमा अंधारे यांना ट्विटद्वारे दिला होता. त्यावर अंधारे यांनी पलटवार केलाय. कोण आहेत या शालिनी ठाकरे? मला माहिती नाही. असल्या बिन महत्वाच्या नेत्यांबद्दल मी काहीही बोलत नाही. dj आणि लेझरबद्दल गेली 10 वर्ष आम्ही लिहितोय आणि बोलतोय. 10-5 आमदार खासदार असणाऱ्यांना बडा नेता म्हणतात ऊगाच काही बोलण्यात अर्थ नाही. नुसतं शालिनी ठाकरे म्हणजे चिप पब्लिसिटी प्रकार आहे. त्यावर मला काही बोलायचं नाही. तरीही हौस असेल तर दिवस वेळ ठिकाण तुम्ही ठरवा माझी निशस्त्र यायची तयारी आहे, असे आव्हान त्यांनी शालिनी ठाकरे यांना दिले.