तो भयंकर संतापला आणि पायातील बूट थेट महानगरपालिका आयुक्तांवर भिरकावला
सांगली महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार यांनी आपल्या कार्यालयात लोकशाही दिन आयोजित केला होता. या लोकशाही दिनासाठी नाईक नागरिकांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यातील एक तक्रारदार कैलास काळे हा यावेळी उपस्थित होता.
सांगली : महानगर पालिका आयुक्तांवर एका अगदी शुल्लक कारणामुळे हल्ला झाला. या घटनेची माहिती पालिका कर्मचाऱ्यांना समजताच त्यांनी आंदोलन सुरु केले. कुणी तरी झाल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि त्यांनी हल्ला करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले. कैलास काळे असे या आरोपीचे नाव असून तो सांगलीचा रहिवाशी आहे. या घटनेमुळे सांगलीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पण, पोलिसांनी आता येथील परिस्थिती नियंत्रणाखाली आणली आहे. मात्र, या हल्ल्याचे कारण ऐकून कुणालाही धक्काच बसेल.
सांगली महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार यांनी आपल्या कार्यालयात लोकशाही दिन आयोजित केला होता. या लोकशाही दिनासाठी नाईक नागरिकांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यातील एक तक्रारदार कैलास काळे हा यावेळी उपस्थित होता. गुंठेवारी निश्चित करण्यासाठी काळे याने शुल्क भरले होते. पण, शासनाने नवा नियम काढला त्यामुळे हे शुल्क वाढले.
शासनाच्या सुधारित नियमानुसार गुंठेवारीचे वाढीव शुल्क भरण्यास काळे याने विरोध केला होता. त्याची सुनावणी आयुक्त घेत होते. यावेळेही त्याने आपण वाढीव शुल्क भरणार नाही अशीच भूमिका घेतली. तेव्हा आयुक्त आणि प्रशासनाने काळे याला नवीन कायद्याची माहिती दिली. तसेच, नवीन शुल्क भरण्याची विंनती केली. याचवेळी आयुक्तांनी जर हा निर्णय मान्य नसेल तर वरिष्ठ कार्यालयात दादा मागण्याचा सल्लाही दिला.
कैलास काळे याला या गोष्टींचा राग आला आणि त्याने आपल्या पायातील बूट कडून थेट आयुक्त पवार यांच्या दिशेने भिरकावला. झाल्या प्रकारामुळे महापालिका कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले. आयुक्तांचे सुरक्षा रक्षक यांनी तातडीने काळे याला ताब्यात घेतले. तर, पालिका कर्मचाऱ्यांनी आयुक्त सुनील पवार यांच्याभोवती सुरक्षा कडे तयार केले.
महापालिका कार्यालयात घडलेला हा प्रकार पोलिसांना कळविण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत महापालिका कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध करत आंदोलन सुरु केले.
आयुक्त सुनील पवार यांनी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची समजूत काढत त्यांना कामावर रुजू होण्याची विंनती केली. आपल्यामुळे कोणत्याही नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात यावी असे त्यांनी सांगितले. या दरम्यान शहर पोलिसांनी हल्लेखोर कैलास काळे याला ताब्यात घेतले आहे. पोलीस त्याची अधिक चौकशी करत आहेत.