Solapur : सोलापुरात आयकर विभागाच्या कारवाईने खळबळ; अभिजित पाटलांच्या चार साखर कारखान्यांवर धाड

सोलापूरमधून (Solapur News) एक मोठी बातमी समोर येत आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आयकर विभागाचे छापे पडले आहेत. सोलापूर शहरातील दोन डॉक्टर आणि एका बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयावर आयकर विभागाने (Income Tax Department) छापा मारला आहे.

Solapur : सोलापुरात आयकर विभागाच्या कारवाईने खळबळ; अभिजित पाटलांच्या चार साखर कारखान्यांवर धाड
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 2:23 PM

सोलापूर : सोलापूरमधून (Solapur News) एक मोठी बातमी समोर येत आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आयकर विभागाचे छापे पडले आहेत. सोलापूर शहरातील दोन डॉक्टर आणि एका बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयावर आयकर विभागाने (Income Tax Department) छापा मारला आहे. यामध्ये बांधकाम व्यवसायिक बिपीन पटेल (Bipin Patel) यांच्या कार्यालयावर तसेच   हृदयरोगतज्ञ डॉ. गुरुनाथ परळे आणि डॉ. अनुपम शाह यांच्या हॉस्पिटलवर आयकर विभागाने धाड टाकल्याची माहिती समोर येत आहे. आयकर विभागाच्या या कारवाईने शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सध्या आयकर विभागाकडून  बिपीन पटेल डॉ. गुरुनाथ परळे आणि डॉ. अनुपम शाह यांच्या कार्यलय आणि हॉस्पिटलची तपासणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या धाडीमध्ये आतापर्यंत  आयकर विभागाच्या हाती नेमकं काय लागलं याची माहिती समोर येऊ शकलेली नाहीये.

अभिजित पाटलांच्या साखर कारखान्यांवर छापा

दरम्यान दुसरीकडे तरुण शेतकरी ते तरुण उद्योजक अशी ओळख असलेल्या अभिजित पाटील यांच्या सोलापूर जिल्ह्यातील चार कारखान्यावर देखील आयकर विभागाने छापा टाकला आहे. सध्या अभिजित पाटील यांच्या चार साखर कारखान्यांची तसेच त्यांच्या ऑफसची आणि घराची आयकर विभागाकडून तपासणी सुरू आहे. अभिजित पाटील यांनी चार साखर कारखाने खरेदी केल्यानंतर ते चांगलेच चर्चेत आले होते. काही दिवसापूर्वीच त्यांनी पंढरपूरमधील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची देखील निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा दणदणीत विजय झाला होता. आज आयकर विभागाकडून अभिजित पाटील यांच्या चार साखर कारखान्यांवर तसेच त्यांच्या ऑफीस आणि घरावर छापा टाकण्यात आला आहे. आयकर विभागाकडून सोलापूरमध्ये करण्यात आलेल्या या छापेमारीमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

छापेमारीमुळे खळबळ

आयकर विभागाकडून सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यात छापेमारी करण्यात आली. यामध्ये साखर कारखानदार अभिजित पाटील, बांधकाम व्यवसायिक बिपीन पटेल  हृदयरोगतज्ञ डॉ. गुरुनाथ परळे आणि डॉ. अनुपम शाह यांच्या घरावर तसेच ऑफीसवर आयकर विभागाच्या वतीने छापा टाकण्यात आला आहे. आयकर विभागाकडून सध्या तपास सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.