वीजनिर्मिती घटल्याने आधीच भारनियमनाची टांगती तलवार असतानाच आता वीज (Electricity) ग्राहकांवर अतिरिक्त बिलाचा भारही येणार आहे. या महिन्यात ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव भरावी लागणार असून, त्या रक्कमेसह आता देयके (Electricity bill) ग्राहकांकडे येऊ लागले आहेत. वर्षभरातील दोन महिन्यांच्या सरासरी वीज वापरानुसार सुरक्षा ठेवीची (Security deposit) रक्कम आकारण्यात येणार आहे. वीज ग्राहकांकडून देयकानुसार सुरक्षा ठेव आकारली जाते. आतापर्यंत एका महिन्याची सुरक्षा ठेव घेण्यात येत होती. आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात ती आकारली जाते. आता मात्र ही ठेव दोन महिन्यांची असेल. या महिन्यात हे देयक आकारले जाणर आहे. त्यामध्ये वर्षभरातील एकूण विजेच्या दोन महिन्यांच्या सरासरीचा विचार करण्यात आला असून, त्यानुसार ग्राहकांकडून आता अतिरिक्त पैसे आकारण्यात येणार आहेत. एकीकडे पैसे देऊन देखील वीज मिळत नाहीये, मात्र दुसरीकडे आता महावितरणाकडून अतिरिक्त पैसे आकारण्यात येत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यात सध्या कोळसा टंचाई आहे. कोळसा नसल्यामुळे वीज पुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे. उन्हाळ्यात अधिक वीज लागते. परंतु कोळसा नसल्यामुळे पुरेशा प्रमाणात वीज निर्मिती होत नाही. त्यामुळे राज्यात पुन्हा लोडशेडिंग सुरू झाले आहे. ग्रामीण भागात लोडशेडिंग वाढवण्यात आले आहे. कधीही बत्ती गूल होत असल्यामुळे नागिक त्रस्त झाले आहेत. आता भरीसभर म्हणजे सुरक्षा ठेवीच्या नावाखाली ग्राहकांकडून दोन महिन्याचे सरासरी भाडे आकारण्यात येत असल्याने वीज ग्राहकांकडून संताप व्यक्त होत आहे.
एकीकडे महाराष्ट्रात अतिरिक्त बिल वसूल करून देखील वेळेवर वीज उपलब्ध होत नाहीये, तर दुसरीकडे पंजाबमध्ये आपच्या भगवंत मान सरकारने नागरिकांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. नवा निर्णय एक जुलैपासून लागू होणार आहे. पंजाबमधील प्रत्येक घरात एक जुलैपासून 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्यात येणार आहे. मात्र दुसरीकडे महाराष्ट्रात आता सुरक्षा ठेवीच्या नावाखाली अतिरिक्त बिलाची वसुली सुरू आहे.
दिलासादायक! पंतप्रधान मोदींच्या काळात गरीबीचे प्रमाण कमी होण्याचा दर वाढला; जागतिक बँकेची माहिती
Maruti Suzuki: SUV कार बाजारात पुन्हा दमदार एन्ट्रीसाठी मारुतीची टोयोटाला साद
Today petrol, diesel rates : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे दर जाहीर, पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर