Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना पाठोपाठ सारीचंही संकट, अहमदनगरसह जालना आणि नाशिकमध्येही फैलाव

राज्यात एकिकडे कोरोना विषाणूचा संसर्ग थैमान घालत आहे. आता दुसरीकडे सारीच्या फैलावाने डोकं वर काढल्याचं पाहायला मिळत आहे (SARI patient in Maharashtra along with Corona).

कोरोना पाठोपाठ सारीचंही संकट, अहमदनगरसह जालना आणि नाशिकमध्येही फैलाव
Follow us
| Updated on: Apr 17, 2020 | 9:21 AM

अहमदनगर : राज्यात एकिकडे कोरोना विषाणूचा संसर्ग थैमान घालत आहे. आता दुसरीकडे सारीच्या फैलावाने डोकं वर काढल्याचं पाहायला मिळत आहे (SARI patient in Maharashtra along with Corona). अहमदनगरसह नाशिक जालना आणि राज्यातील इतर भागात सिविअर अॅक्युट रेस्पिरेटरी इलनेसचा (सारी) फैलाव होताना दिसत आहे. अहमदनगरमध्ये सारीचे देखील 42 रुग्ण आढळले आहेत. अहमदनगरमध्ये सारीने आत्तापर्यंत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावच्या एका महिलेचा नुकताच सारीने मृत्यू झाला आहे. यानंतर अहमदनगर जिल्ह्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. यात संगमनेर, कोपरगाव, नेवासा, अहमदनगर शहर हॉटस्पॉट ठरत आहेत. अहमदगर जिल्ह्यात आज 21 व्यक्तींचे स्त्राव चाचणी केल्यानंतर निगेटिव्ह आले आहेत. तर 33 नमुन्यांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

अहमदनगरमध्ये कोरोना पाठोपाठ सारीचे रुग्णही आढळत आहेत. 11 एप्रिलपासून आजपर्यंत 42 रुग्ण सापडले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय आणि महात्मा फुले जीवनदायी योजने अंतर्गत मान्यता दिलेल्या विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यात 23 पुरुष, 15 स्त्रिया आणि 4 बालकांचा समावेश आहे. अहमदनगरमध्ये कोरोनाचे 28 रुग्ण आहेत, तर सारीचे 42 रुग्ण आढळले आहेत.

जालना

जालन्यात सारीचे दोन रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड यांनी दिली आहे. तसेच इतर दोघांचे स्वॅब नमुने 10 एप्रिलला चाचणीसाठी औरंगाबादला पाठवण्यात आले. दुःखीनगर येथील 65 वर्षीय पहिली पॉझिटिव्ह महिलेची प्रकृती स्थिर आहे.

नाशिक

नाशिकमध्ये देखील कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे. त्यातच आता काही रुग्णांना सारी आजाराचेही लक्षणं दिसत आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयावर याचा ताण अधिक पडत आहे.

संबंधित बातम्या :

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 3202 वर, कोठे किती रुग्ण?

सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवणाऱ्यांना झटका, सायबर विभागाकडून 218 गुन्हे दाखल, 45 आरोपींना अटक

चिमुकल्यापासून आजीबाईंपर्यंत कोरोनाशी यशस्वी लढा, राज्यात कोठे किती रुग्ण बरे?

Corona : पुणे विभागात 518 कोरोनाबाधित, आतापर्यंत 47 जणांचा बळी

कोरोना नियंत्रणाचं काम करणाऱ्या खासगी डॉक्टरांनाही विमा संरक्षण द्या : खासदार राहुल शेवाळे

घर खाली करणे, बांधकाम तोडणे या कारवायांना स्थगिती, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

SARI patient in Maharashtra along with Corona

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.