इथे शिवभोजन थाळी मोफत मिळेल!
इंदापुरात राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रशांत सिताफ यांच्याकडून पुढच्या एक सप्ताहासाठी मोफत शिवभोजन थाळीचं आयोजन केलं गेलं आहे.
इंदापूर (पुणे ) : पुणे जिल्ह्यातील इंदापुरात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाकडून पुढच्या एक सप्ताहासाठी मोफत शिवभोजन थाळीचं आयोजन केलं गेलं आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आलाय. (Indapur NCp Carporater Prashant Sitaf Gives Free Shivbhojan Thali)
इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रशांत सिताफ यांनी प्रजासत्ताक सप्ताह अन्नदान मोफत शिवभोजन थाळी हा अनोखा उपक्रम चालू केलेला आहे. इंदापूर शहरातील बसस्थानकाच्या आवारात असलेल्या शिवभोजन थाळी केंद्रात गोरगरीब लोकांना तसेच गरजू लोकांना मोफत शिवभोजन थाळी दिली जात आहे.
नगरसेवक प्रशांत सिताफ यांच्यामार्फत हा उपक्रम 25 जानेवारी पासून सुरू केलेला असून 31 जानेवारीपर्यंत येणाऱ्या सर्व गरजु लोकांना शिवभोजन थाळी मोफत स्वरूपात देण्यात येणार आहे.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ‘प्रजासत्ताक सप्ताह अन्नदान’ असा हा उपक्रम सुरु केला आहे. दररोज रोज अनेकांना या माध्यमातून मोफत शिवभोजन थाळी दिली जात आहे.
काय आहे शिवभोजन योजना …?
गरीब आणि गरजू व्यक्तींना स्वस्तात भोजन मिळावं यासाठी 10 रुपयांत शासनाने शिवभोजन योजनेची सुरुवात. गेल्या वर्षीच्या 26 जानेवारीपासून (2020 पासून) ही योजना सुरु होणार झाली होती. या योजने अंतर्गत गरीब आणि गरजू नागरिकांना स्वस्त दरात स्वच्छ, पोषक, ताजे भोजन मिळते. कोव्हिड काळात अनेक गरजू, गरीब नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला.
हे ही वाचा :
लय भारी! दत्ता भरणे चहा प्यायला रस्त्यावरील टपरीवर थांबतात तेव्हा…..