ग्राम ‘पंचाईत’! राष्ट्रवादी-भाजपला समसमान जागा, तरी सत्तेची दोरी अपक्षाच्या हाती
निमसाखरेच्या जनतेने कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत दिलेले नाही. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी अपक्ष उमेदवाराचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे (Indapur Gram Panchayat BJP NCP)
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील निमसाखर ग्रामपंचायत निवडणुकीत तब्बल सहा-सहा जागा मिळवूनही भाजप आणि राष्ट्रवादी यांची पंचाईत झाली आहे. कारण सत्तेची दोरी अपक्ष निवडून आलेल्या उमेदवाराच्या हाती असल्याचे चित्र समोर आलं आहे. निमसाखरेच्या जनतेने कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत दिलेले नाही. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी अपक्ष उमेदवाराचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. (Indapur Nimsakhare Gram Panchayat BJP NCP equal seats independent candidate to decide)
भाजप-राष्ट्रवादीला सहा-सहा जागा
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमसाखर ग्रामपंचायत निवडणुकीत तेरा जागांसाठी निवडणूक लागली होती. राष्ट्रवादीला सहा जागा मिळाल्या, तर भाजपलाही सहा जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती जाणार, हा प्रश्न निर्माण झाला. वैशिष्ट्याची बाब म्हणजे या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सुधीर भोसले यांचा विजय झाला. त्यामुळे भोसलेंच्या हातातच आता सत्तेची दोरी आहे.
तेराव्या जागेवर अपक्ष उमेदवार विजयी
निमसाखर गावात तेरा जागांसाठी निवडणूक लागली होती. त्यापैकी दोन जागा बिनविरोध झाल्या होत्या. निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजपला प्रत्येकी सहा जागा मिळाल्या. तेराव्या जागेवरती अपक्ष उमेदवार निवडून आल्याने सत्तास्थापनेसाठी तो महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
इंदापुरातील गावात दोघांनाही 64 मतं
इंदापूर तालुक्यातील सर्वात कमी मतदारांची संख्या असणारे बळपुडी हे गाव आहे. इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांपैकी सर्वात कमी मतदान या गावात होते. फक्त 569 इतके मतदार इथे असल्यामुळे ही निवडणूक खूप अटीतटीची होती. या गावचा निवडून येणारा सदस्य हा एक अंकी संख्येनेच निवडून येईल, असं चित्र होतं. वॉर्ड क्रमांक तीन मध्ये 129 मतदान होतं. त्यापैकी 128 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रताप नामदेव गाढवे आणि लहू बारीकराव गाढवे या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 64 मतं मिळाली. (Indapur Nimsakhare Gram Panchayat BJP NCP equal seats independent candidate to decide)
ईश्वर चिठ्ठीने बळपुडीत उमेदवाराची निवड
टायच्या परिस्थितीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ईश्वर चिठ्ठी पद्धतीने उमेदवार विजयी करण्याचे ठरवले. यात एका लहान मुलाला बोलवून आणले आणि त्याच्या हातून चिठ्ठी काढण्यात आली. यात प्रताप नामदेव गाढवे हे विजयी झाले आहे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
संबंधित बातम्या :
गावगाड्याचा निकाल काय सांगतो?, महाआघाडी, भाजपचं आगामी राजकारण कसं असेल?
(Indapur Nimsakhare Gram Panchayat BJP NCP equal seats independent candidate to decide)