देशासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचा राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान, राष्ट्रपती पदक जाहीर

महाराष्ट्र पोलीस दलात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा उद्या दिल्लीत सन्मान होणार आहे. केंद्र सरकारकडून राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये 17 पोलीस कर्मचाऱ्यांना शौर्य पदक जाहीर झालं आहे.

देशासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचा राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान, राष्ट्रपती पदक जाहीर
महाराष्ट्र पोलीस
Follow us
| Updated on: Aug 14, 2024 | 6:18 PM

भारत देश उद्या 78 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीयांना खूप यातना सोसाव्या लागल्या. भारतीयांनी खूप अत्याचार सहन केले. पण स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या यशस्वी लढ्यामुळे इंग्रजांना आपला देश सोडून जावं लागलं. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वातंत्र्य झाला. भारताला मिळालेलं हे स्वातंत्र्य सोपं नव्हतं. या स्वातंत्र्यांसाठी हजारो नागरिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. अनेक दिग्गज सैनिकांनी आपल्या प्राणांची बाजी मारली आहे. त्यामुळे खूप संघर्षानंतर हे स्वातंत्र्य भारतीयांच्या नशिबात आलं आहे. त्यामुळे स्वातंत्र्य दिवस हा प्रत्येक भारतीयासाठी जास्त महत्त्वाचा आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशाची राजधानी दिल्लीत भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. या कार्यक्रमाला राष्ट्रपतींच्या हस्ते अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो. यामध्ये शाळकरी मुलं, तरुण आणि पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. यावर्षीदेखील राज्यातील 3 वरिष्ठ पोलीस अधिकारी, अग्निशमन दलातील एक अधिकारी, कारावास सेवेतील एक हवालदार यांना पोलीस सेवेतील अतुलनीय कार्यासाठी राष्ट्रपती पदक जाहीर झालं आहे. तर 17 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी पोलीस सेवेतील अतुलनीय शौर्यतेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झालं आहे.

महाराष्ट्रातील पोलीस सेवेतील अतुलनीय कार्यासाठी राष्ट्रपती पदक

  1. चिरंजीव रामचबिला प्रसाद, अतिरिक्त पोलिस महासंचालक
  2. राजेंद्र बालाजीराव दहाळे, संचालक
  3. सतीश रघुवीर गोवेकर, सहायक आयुक्त

अग्निशमन दल

संतोष वारीक, मुख्य अग्निशमन अधिकारी, महाराष्ट्र

कारावास सेवा

अशोक ओलंबा, हवालदार

महाराष्ट्र पोलीस सेवेतील शौर्यतेसाठी राष्ट्रपती पदक

  1. कुणाल शंकर सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी
  2. दीपक आवटे, पोलीस उपनिरीक्षक
  3. कै. धनाजी होनमाने, पोलीस उपनिरीक्षक (मरणोपरांत)
  4. नागेश कुमार एम. (नायक पोलीस शिपाई)
  5. शकील युसूफ शेख ( पोलीस शिपाई)
  6. विश्वनाथ पेंदाम ( पोलीस शिफाई)
  7. विवेक नारोटे ( पोलीस शिपाई)
  8. मोरेश्वर पोटवी ( पोलीस शिपाई)
  9. कैलास कुलमथे (पोलीस शिपाई)
  10. कोठला कोर्मी ( पोलीस शिपाई)
  11. कोर्के वेलडी ( पोलीस शिपाई)
  12. महादेव वानखडे ( पोलीस शिपाई)
  13. आयपीएस अनुज तारे (अतिरिक्त पोलिस अधिक्षक)
  14. राहुल देव्हडे (पोलीस उपनिरीक्षक)
  15. विजय सकपाळ ( पोलीस उपनिरीक्षक)
  16. महेश मिच्छा ( हेड कॉन्स्टेबल)
  17. समया असम ( नायक पोलीस शिपाई)
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.