‘स्वतंत्र मराठवाडा’वरुन सदावर्तेंना काळे झेंडे…; तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, आंदोलनकर्त्यांचा इशारा
उस्मानबादमध्ये स्वतंत्र मराठवाडा संवाद परिषदेसाठी उपस्थित असलेल्या गुणवंत सदावर्तेंना काळे झेंडे दाखवत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.
उस्मानबादः मराठवाडा मुक्ती मोर्चातर्फे उस्मानबादमध्ये स्वतंत्र मराठवाडा संवाद परिषद होत असतानाच कार्यक्रमाला उपस्थित असेलेल अॅड.गुणवंत सदावर्ते यांना मराठी आरक्षणाच्या मुद्यावरुन जोरदार विरोध करण्यात आला. यावेळी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करुन त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. त्यामुळे स्वतंत्र मराठवाडा संवाद परिषद चालू असताना जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. या कार्यक्रमावेळी निषेध व्यक्त करणाऱ्या कार्यर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सदावर्तेंना यावेळी काळे झेंडेही दाखवण्यात आले.
अॅड. गुणवंत सदावर्ते आज उस्मानबादमध्ये स्वतंत्र मराठवाडा संवाद परिषदेत उपस्थित राहिले होते. यावेळी जालना, नांदेड, औरंगाबाद या ठिकाणांहून अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गुणवतं सदावर्ते यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक होत त्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
स्वंत्रत्र मराठवाड्याची मागणी करण्यासाठी आलेल्या गुणवंत सदावर्ते उस्मानबादमध्ये आले असताना त्यांच्या स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीला जोरदार विरोध करण्यात आला.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी अखंड महाराष्ट्र राहिला पाहिजे, महाराष्ट्राचे तुकडे पडता कामा नये अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
यावेळी गुणवंत सदावर्ते यांनीही स्वतंत्र मराठवाडा झाला पाहिजे अशी घोषणा देत. त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. तर त्यांना विरोध करणाऱ्या आंदोलनकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत अखंड महाराष्ट्र राहिला पाहिजे अशा जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.