नौदलासाठी राज्यात तयार झाले देशातील पहिले पॅसेंजर ड्रोन, वरुण ड्रोन १३० किलो वजन उचलण्यात सक्षम, खराब झाल्यास विनाअपघाता करणार लँडिंग
हे ड्रोन पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना जुलैत दाखवण्यात आले आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हेही उपस्थित होते. हवाई वाहतूक मंत्रालयाने सोशल मीडिया अकाऊंटवरुन याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
मुंबई– महाराष्ट्रासाठी एक आनंदाची बातमी, महाराष्ट्राने भारतीय नौदलासाठी (Indian Navy) पहिले पॅसेंजर ड्रोन (Passenger Drone) तयार करण्यात आले आहे. या ड्रोनचे नाव वरुण असे ठेवण्यात आले आहे. हे ड्रोन 130 किलोग्राम वजन सोबत घेऊन उडू शकणार आहे. याचे वैशिष्ठ्य म्हणजे, हा ड्रोन 25 किमी प्रवास केवळ 25 ते 33 मिनिटांत पूर्ण करु शकणार आहे. पुण्याच्या चाकणमधील सागर डिफेन्स इंजिनिअरिंग कंपनीने हे ड्रोन तयार केले आहे. हे ड्रोन पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना जुलैत दाखवण्यात आले आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हेही उपस्थित होते. हवाई वाहतूक मंत्रालयाने सोशल मीडिया अकाऊंटवरुन याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
तांत्रिक बिघाड झाल्यास पॅराशूटच्या सहाय्याने होणार सुरक्षित लँडिंग
कंपनीचे सहसंस्थापक बब्बर यांनी सांगितले की, जर ड्रोनमध्ये हवेत तांत्रिक बिघाड झाल्यानंतरही ड्रोन सुरक्षित लँडिंग करेल. यात एक पॅराशूटही जोडण्यात आलेले आहे. आपतकालीन स्थितीत किंवा बिघाड झाल्यास, पॅराशूट आपोआप उघडेल आणि ड्रोन सुरक्षित लँडिंग करेल. वरुणचा उपयोग एयर अँम्ब्युलन्स आणि दूरपर्यंत सामान पोहचवण्यासाठी करण्यात येऊ शकतो.
3 महिन्यांत सुरु होणार वरुणचे परीक्षण
हे ड्रोन पूर्णपणे स्वयंचलित आहे. म्हणजेच नेव्ही ऑफिसर्स यांना केवळ यात केवळ बसायचे आहे. त्यानंतर ड्रोनच त्यांना एका जागेवरुन दुसऱ्या जानेवर नेणार आहे. त्याचबोसत येत्या ३ महिन्यांत वरुणचे समुद्रातील परीक्षण सुरु करण्यात येणार आहे. या ड्रोनमुळे सैन्याच्या ताकदीत आणखी वाढ होणार आहे. भारतीय सैन्यदलाची अधुनिकतेकडे वेगाने वाटचाल सुरू आहे.