महाराष्ट्रात एकाच ठिकाणी दोन रेल्वे स्टेशन ते देखील वेगवेगळ्या नावाने, कुठे आहेत ?

महाराष्ट्रात रेल्वेचा विस्तार मोठ्या प्रमाणात आहे. तसा रेल्वेचा इतर देशांच्या तुलनेत विचार केला तर भारताचा रेल्वे विस्तारात जगात चौथा क्रमांक लागतो.

महाराष्ट्रात एकाच ठिकाणी दोन रेल्वे स्टेशन ते देखील वेगवेगळ्या नावाने, कुठे आहेत ?
Image Credit source: FACEBOOK
Follow us
| Updated on: Sep 28, 2022 | 12:49 PM

Indian Railways : एकाच ठिकाणी दोन वेगवेगळ्या नावांची रेल्वे स्थानके (Railways Station) आहेत. असे तुम्हाला कुणी सांगितले तर विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. ते देखील महाराष्ट्रातच. महाराष्ट्रात (Maharashtra) असलेल्या अहमदनगर (Ahamdnagar) जिल्ह्यात ही आश्चर्यकारक बाब आहे. श्रीरामपुर आणि बेलापुर ही दोन स्थानकं एकाच ठिकाणी आहे. फक्त या स्थानकांचे रेल्वे ट्रॅक विरुद्ध दिशेला आहे. या स्थानकांमुळे अनेक प्रवाश्यांची दिशाभूल होत असते. त्यामुळे या स्थानाकावरून प्रवास करणाऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागते. प्लॅटफॉर्म क्रमांक तपासूनच येथे प्रवास करावा लागतो. अन्यथा प्रवाशांचा गोंधळ हा निश्चित असतो.

महाराष्ट्रात रेल्वेचा विस्तार मोठ्या प्रमाणात आहे. तसा रेल्वेचा इतर देशांच्या तुलनेत विचार केला तर भारताचा रेल्वे विस्तारात जगात चौथा क्रमांक लागतो.

याशिवाय ऑस्ट्रेलियाची जितकी लोकसंख्या आहेत तितकेच प्रवासी भारतातील रेल्वेने दररोज प्रवास करतात असा दावा देखील अनेकदा केला जातो.

त्यामुळे भारतातील रेल्वेचा विस्तार बघता रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रेल्वेचा विस्तार करतांना विशेष काळजी घेण्यात आली आहे.

असे असले तरी महाराष्ट्रात अहमदनगर येथील एकाच ठिकाणी दोन वेगवेगळ्या नावाची असलेली रेल्वे स्थानके अनेकदा चर्चेचा विषय ठरत असते.

याशिवाय असे देखील एक रेल्वे स्थानक आहे जिथे दोन राज्यांची सीमा आहेत. महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची सीमा असलेल्या ठिकाणी नवापुर रेल्वे स्थानक आहे.

या रेल्वेस्थानकावर एक अशी बाब आहे जी संपूर्ण देशात कुठेही नाही. एकच प्रवासी सूचना ही चार भाषेत केली जाते. त्यात इंग्रजी, हिन्दी, मराठी आणि गुजराती भाषांचा समावेश आहे.

त्यामुळे शक्यतो आपण कुठल्याही रेल्वे स्थानकावर गेलो तर तिथे एकाच स्थानकाचे नाव असते. परंतु महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एकाच ठिकाणी दोन स्थानके असल्याने त्याची अनेकदा चर्चा होत असते.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.