Video : इराणमध्ये अडकलेल्या वरळीतील तरुणांना सोडवण्यासाठी पंतप्रधानांना साकडं, आदित्य ठाकरेंकडूनही आश्वासन

इराणमध्ये अडकलेल्या भारतातील तरुणांमध्ये वरळीचा अनिकेत येनपुर आणि मंदार वरळीकर यांचा समावेश आहे. तस्करी प्रकरणात त्यांना इराणमध्ये अटक करण्यात आली होती. तिथल्या कोर्टानं त्यांची निर्दोष मुक्तता करुनही त्यांना अद्याप भारताच्या स्वाधीन करण्यात आलेलं नाही.

Video : इराणमध्ये अडकलेल्या वरळीतील तरुणांना सोडवण्यासाठी पंतप्रधानांना साकडं, आदित्य ठाकरेंकडूनही आश्वासन
भारतातील तरुण इराणमध्ये अडकले
Follow us
| Updated on: Jul 14, 2021 | 10:22 PM

मुंबई : मर्चंट नेव्हीमध्ये कामाला असलेले वरळीतील 2 मुलांसह 5 भारतीय तरुण इराणमध्ये अडकून पडले आहेत. या तरुणांना भारतात परत आणण्यासाठी त्यांच्या पालकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडं घातलं आहे. इराणमध्ये अडकलेल्या भारतातील तरुणांमध्ये वरळीचा अनिकेत येनपुर आणि मंदार वरळीकर यांचा समावेश आहे. तस्करी प्रकरणात त्यांना इराणमध्ये अटक करण्यात आली होती. तिथल्या कोर्टानं त्यांची निर्दोष मुक्तता करुनही त्यांना अद्याप भारताच्या स्वाधीन करण्यात आलेलं नाही. (2 youths from Worli stranded in Iran, Letter to PM Modi to release those youths)

कुटुंबाची आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी या मुलांनी मर्चंट नेव्हीची नोकरी स्वीकारली होती. तस्करीच्या प्रकरणात त्यांना इराणमध्ये अटक करण्यात आली. या प्रकरणात तिथल्या कोर्टानं त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. असं असूनही त्यांची कागदपत्र त्यांना दिली जात नाहीत. असा आरोप या तरुणांनी केलाय. दुसरीकडे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असूनही या मुलांच्या पालकांना दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागत आहेत. दिल्लीतूनही त्यांच्या पदरी आश्वासनापलिकडे काहीच पडत नसल्याची खंत त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलीय. या मुलांच्या पालकांनी पंतप्रधानांना पत्रही लिहिलं आहे. मात्र, अद्याप त्यावर कारवाई झालेली नसल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

आदित्य ठाकरेंचं आश्वासन

राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी ही बाब कालच आपल्या कानावर आल्याचं त्यांनी सांगितलं. त्या मुलांशी आपण संपर्क साधत आहोत. तसंच त्या देशासोबतही संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु आहे. याबाबत पराराष्ट्र मंत्रालयाशी आपण बोलणार आहोत. ही मुलंल लवकरात लवकर परत येवोत हीच सर्वांची इच्छा आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

इराणमध्ये अडकलेल्या मुलांची व्यथा

आम्हाला एका खोट्या केसमध्ये अडकवण्यात आलं होतं. शिप ओनर आणि एजंटमुळे आम्ही या केसमध्ये अडकलो होतो. आम्ही जवळपास 400 दिवस जेलमध्ये होतो. 9 मार्च 2021 रोजी आमची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. इथंही आम्ही भारताचं नाव कायम राखलं आहे. आम्ही कुठलीही चुकीची गोष्ट केलेली नाही. आमची निर्दोष मुक्तता झाल्यानंतरही इराण सरकारकडून आमचा पासपोर्ट दिला गेला नाही. तसंच आमची कुठलीही कागदपत्र दिली गेली आहेत. इथे आमची स्थिती एखाद्या जनावराप्रमाणे झाली आहे, अशा शब्दात या तरुणांनी आपली व्यथा मांडली आहे.

इतर बातम्या :

‘देवेंद्र फडणवीस राजकारणातील सर्वात लबाड माणूस’, अनिल गोटेंचा जोरदार निशाणा

Maharashtra tourism policy 2021 : आदित्य ठाकरेंचं मोठं प्लॅनिंग, साहसी पर्यटन धोरण मंजूर, नेमकं नियोजन काय?

2 youths from Worli stranded in Iran, Letter to PM Modi to release those youths

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.