उद्योगपतींना ईडीची भीती दाखविली जाते, रॉबर्ट वाड्रा यांना घणाघात
मुलांनी मला शक्ती दिली. अंध मुलांना मदत करतो.
अहमदनगर : उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांनी आज अहमदनगर येथे भेट दिली. यावेळी प्रियंका गांधी यांचे पती वाड्रा यांनी पत्रकार परिषद घेतली. रॉबर्ट वाड्रा म्हणाले, उद्योग राज्याबाहेर का जातायत. कारण उद्योगपतींना भीती दाखविली जाते. राहुल गांधी यांचा विचार बाबांसारखा असतो. सर्व लोकांसोबत जुळतात. लोकांसोबत चुकीचं होतं. त्याच्यावर ते समाधान काढण्याचा प्रयत्न करतात.
काँग्रेससोबत लोकं जुळतील. लोकं आमच्यासोबत येतील. आम्ही लोकं लोकांसोबत आहोत. गांधी कुटुंब लोकांना मदत करते. जे नवे अध्यक्ष आहेत ते लोकांना मदत करतील. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासोबत काम करतील, अशी अपेक्षा रॉबर्ट वाड्रा यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, सरकार भीती निर्माण करते. यामुळं लोकं नाराज आहेत. यामुळं प्रगती होणार नाही. शेतकरी रस्त्यावर होते. पुढच्या पिढीसाठी हे काम विचार करतील. भीती दाखवतात. हे सरकार लोकांचं म्हणणं ऐकत नाही.
राहुल गांधी यांनी कोविडच्या वेळी बोलले होते. रोजगार वाढविण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे. आर्थिक प्रगती झाली पाहिजे. लोकं देश सोडून जातात. उद्योगपती देश सोडून जातात. एजन्सीचा चुकीचा वापर केला जातो.हे याला कारण आहे, असा घणाघातही रॉबर्ट वाड्रा यांनी केला.
प्रियंका हिमाचलमध्ये आहे. त्या प्रत्येक भागात जातील. राहुल गांधींसोबत आम्ही जातो. पण, मी समोर येत नाही. सुरक्षा सर्वात मोठी बाब आहे. ईडीनं सोनिया गांधी यांना बोलावलं होतं. पण, भाजपचं राजकारण चुकीचं आहे.
मी लोकांना मदत करतो. मुलांनी मला शक्ती दिली. अंध मुलांना मदत करतो. त्यांच्याकडून मला त्यांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न करतो. राहुल निडर आहेत. आम्ही दोघेही फिटनेसकडं जास्त भर देतो. युवक, महिला यांच्या सुरक्षेसाठी ते प्रयत्न करतात, असं त्यांनी सांगितलं.
मला दर आठवड्यात लोकांसोबत असतो. राहुल प्रत्येक ठिकाणी जातात. राहुल यांच्यात बरीच ताकद आहे. लोकं त्यांच्यावर भरोसा करत आहेत. लोकं त्यांच्यासोबत जुळतील, असा आशावादही रॉबर्ट वाड्रा यांनी व्यक्त केला.