ऑपरेशन करतांना चक्क स्क्रूसह मेटल्स तुटले, कुठं घडलं हे?
नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडल्याने रुग्णालयातील उपकरणांबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.
नाशिक : सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवा कमी दरात मिळावी यासाठी शासनाने जिल्हा पातळीवर जिल्हा रुग्णालये (civil hospital) सुरू केलीय. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी शासन (Goverment) पुरवत असते. त्यानुसार अनेक नागरिक या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातून येत असतात. पण, याच सर्वसामान्य जनतेच्या जिवाशी खेळ सुरू असल्याची बाब समोर आली आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात एका शस्रक्रियेबद्दल (operation) मोठी माहिती समोर आली, चक्क शस्रक्रियेदरम्यान स्क्रू आणि मेटल्स तुटल्याचे समोर आले आहे.
नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडल्याने रुग्णालयातील उपकरणांबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.
निकृष्ट उपकरणे खरेदी करून रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा उद्योग कुणी केला याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांनी याबाबत चौकशी सुरू केली आहे.
नाशिकचे जिल्हा रुग्णालय नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणावरुन चर्चेत असते. यापूर्वी देखील अनेक उपकरणे पडून असल्याने रुग्णालय चर्चेत आले होते.
उपकरणांसाठी शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे अनुदान देण्यात येते. या पैशातून रुग्णांना लागणारी औषधे आणि उपकरणे याची खरेदी केली जाते.
कागदोपत्री या निविदा बघता नामांकित कंपन्यांना याबाबतचे टेंडर दिलेले आहेत. मात्र, उपकरणे निकृष्ट आढळून आल्याने टेंडरप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
खरेदी केलेल्या उपकरणांची तपसणी करण्याचे आदेश जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिले आहे.
शस्रक्रियेसाठी उपकरणे मिळत नसल्याची देखील तक्रार शल्य चिकित्सक यांच्याकडे प्राप्त झाली आहे, त्यानुसार आता चौकशी केली जाणार आहे.
जवळपास ७५ कोटी रुपयांचे साहित्य खरेदी केलेले असल्याने आता त्याचीही तपासणी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.