Jalana News : वरच्या वर्गात बसला म्हणून शिक्षकाची विद्यार्थ्याला अमानुष मारहाण
वय जास्त दिसत असल्याने वर्गशिक्षकाने वरच्या वर्गात बसायला सांगितल्याने एक सातवीच्या वर्गातील विद्यार्थी नववीच्या वर्गात बसला. परंतू अभ्यास न केल्यानंतर मुख्याध्यापकाने जेव्हा त्याला विचारले तेव्हा त्याने खरी बाब सांगितली.परंतू मुख्याध्यापकाने त्याला लिंबाच्या काडीने फोडून कढल्याची घटना घडली आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेत एका विद्यार्थ्याला केवळ वरच्या वर्गात का बसला म्हणून शाळेच्या मुख्याध्यापकाने अमानुषपणे मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सातवीच्या एका विद्यार्थ्याला नववीच्या वर्गात बसला म्हणून मुख्याध्यापकाने लिंबाच्या काठीने झोडपल्याची घटना घडली आहे. या शाळेतील या विद्यार्थ्यांच्या मांडीवर आणि पायावर काठीचे वळ उठले असून सूज आल्याने त्याची प्रकृती बिघडली आहे. या प्रकरणात मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची मागणी मुलाच्या पालकांनी केली आहे. या प्रकरणात गोंदी पोलिस ठाण्यात मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्याला अमानुष मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नववीच्या वर्गात का बसला असे म्हणत मुख्याध्यापकाने या विद्यार्थ्याच्या पायावर आणि मांडीवर अमानुषपणे मारहाण केल्याचे उघड झाले आहे. हा विद्यार्थी 14 वर्षांचा आहे. या अल्पवयीन मुलाच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून या प्रकरणी मुख्याध्यापक खेडकर यांच्याविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फैजान आयुब शेख इयत्ता सातवीत असला तरी त्याचे वय जास्त असल्याने त्याला त्याचे सातवीचे वर्ग शिक्षक नरसाडे सरांनी इयत्ता नववीच्या वर्गात बसायला सांगितले. त्यांच्या सूचनेनुसार आपण 23 डिसेंबर पासून नववीच्या वर्गात बसत आहे. मात्र, दि. 6 जानेवारी रोजी आमच्या शाळेतील नववीच्या वर्गात आपण बसलो असताना शाळेत पाचवा तास शिकवायला मुख्याध्यापक खेडकर सर आले. ते दररोज मराठी विषय शिकवतात. त्यांनी शिकवलेल्या धड्याची प्रश्नोत्तर लिहून आणली काय असे वर्गात विचारल्यावर प्रश्नोत्तर लिहिलेले नसल्याने आपण प्रश्नोत्तर न लिहिलेल्या मुलासोबत वर्गात उभा राहिलो असे विद्यार्थ्याने तक्रारीत म्हटले आहे.
सरांनी डोक्याचे केस पकडून मारहाण केली
तेव्हा खेडकर सरांनी आपल्याला जवळ बोलावून प्रश्नोत्तर का नाही लिहिली नाहीत असे विचारले. तेव्हा मी त्यांना म्हणालो की,मला वर्गात येऊन सात-आठ दिवस झालेले असून मी वर्गात नवीन आहे. असे म्हटल्यावर त्यांनी तू नववीच्या वर्गात कसा काय आलास आणि कसा बसलास असे म्हणत त्यांनी आपल्या डोक्याचे केस पकडून लिबांच्या काडीने दोन्ही पायाच्या मांडीवर पाठीमागे आणि माझ्या गालावर मारले आणि हातावर सुज येईपर्यंत मारहाण केल्याचे या विद्यार्थ्यांने म्हटले तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात विद्यार्थाचे पालक शेख यांनी गोंदी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.