Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परमबीर सिंग यांची प्रॉपर्टी किती, जनतेला कळू द्या, राष्ट्रवादीची मोठी मागणी

परमबीर सिंग यांच्या संपत्तीची चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (NCP Shashikant Shinde) यांनी परमबीर सिंगांच्या मालमत्तेच्या चौकशीची मागणी केली आहे.

परमबीर सिंग यांची प्रॉपर्टी किती, जनतेला कळू द्या, राष्ट्रवादीची मोठी मागणी
Param Bir Singh
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 5:26 PM

सातारा : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटरबॉम्ब (Parambir Singh letter) टाकून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून (Maharashtra home Minister Anil Deshmukh) दिली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीकडून परमबीर सिंगांवर पलटवार केला जात आहे. परमबीर सिंग यांच्या संपत्तीची चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (NCP Shashikant Shinde) यांनी परमबीर सिंगांच्या मालमत्तेच्या  (Parambir Singh property) चौकशीची मागणी केली आहे. (Inquire about the property of Parambir Singh, NCP demands )

“माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली ही त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर केली. तरीदेखील परमबीर सिंग यांनी याचिका दाखल केली आहे. यामागे कुणाचा हात आहे हे सर्वज्ञात आहे. दिल्लीला गेल्यानंतर एवढा बदल कसा होतो” असा प्रश्न राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे. त्या अधिकाऱ्याची प्रॉपर्टी किती आहे याची चौकशी करावी, अशी मागणी शिंदे यांनी राज्य सरकारला केली आहे.

प्रॉपर्टी किती जनतेला कळू द्या

राज्य सरकारला माझी विनंती आहे की या IPS अधिकाऱ्याची किती प्रॉपर्टी आहे याचा शोध घ्यावा. अधिकारी प्रामाणिक काम करत होते की नाही हे महाराष्ट्रातील जनतेला कळू द्या. अनेक ठिकाणी अनेक प्रॉपर्टी आहेत असं कळतंय, त्याची चौकशी व्हावी. राज्य सरकारने अशा अधिकाऱ्यांना पाठिशी घालू नये. दबक्या आवाजात जी चर्चा आहे, असे अधिकारी का बदलले हे जनतेला कळू द्या, असं शशिकांत शिंदे म्हणाले.

परमबीर सिंगांचा लेटरबॉम्ब

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित एपीआय सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक दावा केला होता. सचिन वाझे हे मनसुख वाझे मृत्यूप्रकरणात मुख्य आरोपी आहेत. मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं सचिन वाझेंनी ठेवल्याचा आरोप आहे.

परमबीर सिंगांची सुप्रीम कोर्टात याचिका  

परमबीर सिंग यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आपण जे आरोप केले आहेत. त्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी सिंग यांनी या याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेत आपण केल्या सर्व आरोपांची चौकशी करावी. त्यासाठी सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात यावेत अशी मागणी केली आहे.

शरद पवार अनिल देशमुखांच्या पाठिशी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचं दिसत आहे. कारण माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्राची चिरफाड करताना, शरद पवारांनी अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलं आहे. त्यासाठी त्यांनी परमबीर सिंगांच्या पत्राचा दाखला दिला. पवार म्हणाले, ज्या कालावधीचा उल्लेख करुन परमबीर सिंगांनी भेटीचा उल्लेख केला, त्या कालावधीत अनिल देशमुख हे कोरोनावरील उपचारासाठी नागपुरातील रुग्णालयात दाखल होते. त्यामुळे परमबीर सिंगांच्या आरोपात काही तथ्य नाही असं शरद पवार म्हणाले.

VIDEO : परमबीर सिंगांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी

संबंधित बातम्या   

परमबीर सिंग यांची सर्वोच्च न्यायालयात धाव, गृहमंत्री देशमुखांच्या घरातील सीसीटीव्ही तपासा!

मी आनंदी आहे, आता ATS करेक्ट कार्यक्रम करेल, राजधानीत शरद पवारांचा हुंकार

'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं
'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं.
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.