International women’s day 2021 | गावाचा सगळा कारभार फक्त महिलांकडे; अहमदनगरच्या ‘या’ गावाचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा

अहमदनगर जिल्ह्यातील मोऱयाचिंचोरे असे गाव आहे, ज्या गावाचा सर्व कारभार फक्त आणि फक्त महिलाच हाकतात.

International women's day 2021 | गावाचा सगळा कारभार फक्त महिलांकडे; अहमदनगरच्या 'या' गावाचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा
गावातील महिला वृक्षारोपण करताना
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 4:07 PM

अहमदनगर : संपूर्ण भारतभर आज महिलादिन(women’s day) साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर महिलांना भेटवस्तू देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या जातायत. महिलांना प्रत्येक क्षेत्रात समान संधी दिली जावी असे या निमित्ताने म्हटले जाते. मात्र, अजूनही अशी अनेक क्षेत्रं आहेत; ज्यामध्ये महिलांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले जात नाहीत. राजकीय क्षेत्रामध्ये तर महिलांचे प्रमाण नगण्य असेच आहे. ग्रामीण भागात ही परिस्थिती अजूनही वाईट आहे. मात्र, अहमदनगर जिल्ह्यातील मोऱयाचिंचोरे  हे असे गाव आहे, ज्या गावाचा सर्व कारभार फक्त आणि फक्त महिलाच हाकतात. येथे सरपंचापासून ते गावातील अनेक समित्यांवर फक्त महिलाच सदस्य आहेत. महिला दिनाचे औचित्य साधून त्यांना समान संधी देणाऱ्या या गावाची चर्चा राज्यभर होत आहे. (International Women’s Day 2021 Ahmednagar all the rights and decisions are given to women in Moryachinchore village)

गावातील सरपंचपद महिलेकडे

मोरयाचिंचोरे या गावाचा सर्व कारभार महिलांकडे आहे. गावाच्या सरपंच महिलाच असल्यामुळे गावाचे विकासविषयक निर्णय महिलेकडूनच घेतले जातात. तसेच, सरपंचपदच नव्हे तर या उपसरपंचपदसुद्धा गावातील महिलेकडेच आहे. म्हणजे, राजकारण हा महिलांचा प्रदेश नाही असं म्हणून त्यांना डावलण्याचा प्रयत्न होत झाल्याची अनेक उदाहरणं असताना, या गावात राजकारण आणि समाजकारणाचा गाडा फक्त महिलाच हाकतात. या गावात ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य या महिलाच आहेत.

गावाच्या सर्व समित्यांचा कारभार महिलांकडे

मोरयाचिंचोरे या गावाच्या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यसुद्धा महिलाच असल्यामुळे गावातील सर्व समित्यांमध्ये महिलांचीच नियुक्ती केलेली आहे. येथील वाचनालय समितीमध्ये सर्व महिला सदस्य आहेत. तसेच, वनरकक्षण कमिटी, आदर्शगाव कमिटी, तंटा मुक्ती समिती, स्वच्छता समिती, शाळा व्यवस्थापन समिती या समित्यांच्या प्रमुखही महिलाच आहेत. गावातील सर्व विकासकामांचे तसेच समारंभाचे उद्धाटनसुद्धा महिलांच्याच हस्ते करण्यात येते.

महिलादिनानिमित्त गावात वृक्षारोपण

येथील महिला सामाजिक उपक्रमांमध्येसुद्धा सक्रिय असतात. आज जागतिक महिलादिन असल्यामुळे मोरयचिंचोरे गावात 251 महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. येवेळी गावाच्या परिसरात 1000 झाडांचे रोपण गेले गेले. यामध्ये कडुनिंब, जांभूळ, चिंच, वड, पिंपळ या देशी वृक्षांचा समावेश आहे. या वृक्षारोपन उपक्रमात मोऱयाचिंचोरे येथे नेवासा तालुक्यातील विविध गावातील यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या महिला सदस्या यावेळी उपस्थित होत्या. सोशल डिस्टन्सिंग पाळत यावेळी महिलांनी वृक्ष दिंडी काढत वृक्षारोपण केले. यशवंतराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत गडाख यांच्या संकल्पनेतून हे वृक्षारोपण केले गेले.

दरम्यान, मोरयाचिंचोरे या गावाचा सर्व कारभार महिलांकडे असल्यामुळे गाव प्रगतीपथावर असल्याचे येथील नागरिक सांगतात. महिलांना अधिकार दिल्यास त्या योग्य आणि परिस्थितीला पूरक असे निर्णय घेऊ शकतात, याचे उदाहरण हे गाव ठरत आहे.

इतर बातम्या :

International Women’s Day 2021 | जगात महिलांचे स्थान उल्लेखनीय, गुगलकडून नारीशक्तीचा अनोखा सन्मान

 (International Women’s Day 2021 Ahmednagar all the rights and decisions are given to women in Moryachinchore village)
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.