सोबतच्या महिलांना Happy Women’s Day म्हणताय? जरा थांबा, त्यांना नेमकं काय हवंय, तेही जाणून घ्या!

World Women's Day आला की आपल्याला आठवते आपल्या सोबत राहणारी महिला. आई, पत्नी, बहीण, मुलगी असो वा मैत्रीण.. किती पातळ्यांवर काम (Powerful Women) करत असते, अडचणींवर मात करत असते वगैरे वैगेरे..

सोबतच्या महिलांना Happy Women's Day म्हणताय? जरा थांबा, त्यांना नेमकं काय हवंय, तेही जाणून घ्या!
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 2:00 AM

World Women’s Day आला की आपल्याला आठवते आपल्या सोबत राहणारी महिला. आई, पत्नी, बहीण, मुलगी असो वा मैत्रीण.. किती पातळ्यांवर काम (Powerful Women) करत असते, अडचणींवर मात करत असते वगैरे वैगेरे.. आज तिच्यात देवी दिसते, दुर्गा आठवते, दयाळूपणा, कर्तबगारीता, सोशिकता, सहनशीलता, प्रसंगावधान, ममत्व किती किती गुणं, रुपं दिसू लागतात. मोठ्या मनानं तिचं कौतुक केलं जातं. घरातलं सगळं सांभाळून बाहेर नोकरी करणाऱ्यांचंही कौतुक होतं. गृहिणी म्हणून कर्तव्यदक्ष राहणाऱ्या महिलांवरही स्तुतीसुमनं उधळली जातात. आज काय महिला दिन, आपण घरातल्या महिलेला जरा वेगळी ट्रिटमेंट देऊ, (Women’s Day Celebration) आज तिला फार काम करू द्यायचं नाही, आज तिच्या आवडत्या गोष्टी करायच्या असे सगळे प्लॅन होत असतील. पण खरंच तिला काय आवडतं, महिला म्हणून तिला नक्की काय हवंय, असं कधी विचारलंय? आज थोडा तसाही विचार करून पाहुयात-

आज तिला काही वेगळी ट्रिटमेंट देताय?

आज महिला दिनासाठी आपल्यासोबत राहणाऱ्या महिलेला काही तरी वेगळं गिफ्ट देण्याचा विचार करत असाल. तुमचं बरोबर आहे हो. एकच दिवस तिच्या हक्काचा आहे, असं वाटतंय. तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी म्हणून तुम्ही करतही असाल. अर्थात ही भावना असणारे लोकही कमीच असतात. तरीही आपण मानुयात की हल्ली सगळंच सेलिब्रेट करण्याचा जमाना आहे. त्यामुळे अनेकांना हा दिवसही साजरा करायचाय. त्यामुळे घरात आज महिला दिनाच्या निमित्तानं जरा उलट प्रवाह असेल. घरातला नवरा, बाबा आज किचनमध्ये उभा राहतोय, सकाळचा पहिला चहा करायचा प्रयत्न करतोय. तुम्ही एवढं कौतुक करताय म्हणून तिला थोडं ऑड वाटतंय. राहू देत ना, कुठे करतोय? असं मनातल्या मनात वाटतंय. कारण एका दिवसाचं उसनेपण नकोय. तिला समानता हवीय. म्हणजे महिन्यातले पंधरा दिवस तिने आणि पंधरा दिवस त्याने करणं अपेक्षित आहे. ही समानता. हे झेपणं कठीण आहे. पण महिन्यातले काही दिवस तरी स्वतःहून आपण तिला सकाळचा पहिला चहा करून दिला तर? आज तुझा दिवस आहे, म्हणून मी हे करतोय, असं म्हणण्यापेक्षा इतर कोणत्याही दिवशी, हा आपला दिवस आहे, आज मी आपल्या घरासाठी हे करतो, तू हे कर, असं ठरवून दिलं तर? थोडा विचार करुन पहा.

गप्पांमध्ये ‘ती’ येताच, तुमची प्रतिक्रिया काय असते?

पुरुष मित्रांमध्ये बायकोचा विषय निघाला की काय काय चेष्टा केली जाते. आपली बायको, तिचा स्वभाव, तिच्या मैत्रीणी, शेजारच्या बायका, तिची शॉपिंगची आवड, तिचे वेगवेगळे पदार्थ करण्याचे प्रयोग, एखाद्या गोष्टीसाठी केलेला हट्ट अशा कितीतरी विषयांवर सगळे पुरुष एका प्रवाहात येतात. एखादा तरी असतो का की, नाही माझी बायको अशी नाही. किंवा ती असं वागत असली तरीही ती काय करते, कसं बोलते, कसं वागते, किती गप्पा मारते, किती हसते, हा सगळा तिचा प्रश्न आहे. तिचं जग आहे, तिची आवड आहे, तिला स्वातंत्र्य आहे, तसं जगण्याचा. गप्पांच्या मैफलीतच ठामपणे सांगणारे असे किती पुरुष आहेत?

बायकांवरचे जोक्स फॉरवर्ड करता?

बायकांना वेड्यात काढणारे, बायकांच्या नैसर्गिक स्वभावाची चेष्टा करणारे विनोद व्हॉट्सअपवर पाठवून हसऱ्या प्रतिक्रिया मिळवल्या जातात. अनेक फॅमिली ग्रुपवर तर अशा विनोदांचा सुळसुळाट असतो. विशेष म्हणजे, ग्रुपमधल्या महिलांनाही याचं काहीच वाटत नाही. त्याच्या बरोबरीनं जबाबदाऱ्या पार पाडूनही का प्रत्येक वेळी टार्गेट व्हायचं? आपलंच हसं करुन घ्यायचं? म्हणजे बघा – या जोक्सपैकी एक नेहमीचा विषय म्हणजे- कुठे बाहेर निघायचं म्हटलं की आमच्या बायकोला किमान एक तासभर तरी लागतो. मी आपलं दोन मिनिटात रेडी होऊन बाहेर गाडी घेऊन उभा असतो, असं थाटात सांगणाऱ्या नवऱ्यांना तिला आवरण्यासाठी एवढा वेळ का लागतो, असा विचार केलाय कधी? घरातल्या दहा गोष्टी जागच्या जागी ठेवून, आपण बाहेर पडल्यावर घरात काय लागू शकतं, त्याची सगळी व्यवस्था पाहून ती निघते. त्यानंतर तिचं स्वतःचं आवरणं. मुलगा-मुलगी सोबत असेल तर त्याचं आवरुन देणं… हे सगळं तिनं करायचं आणि मग बाहेर पडायचं.. आपण फक्त तयार होऊन घराबाहेर उभे राहतो. अर्थात प्रत्येक घरातली स्थिती थोड्या-बहुत फरकाने वेगळी असू शकते. पण ढोबळ मानाने, महिलांच्या ज्या वर्तणुकीवर विनोद घडतात, त्यासाठी आपण किती जबाबदार असतो हेही एकदा तपासून घेऊयात की.

तिच्या कर्तृत्वाचं कौतुक आहे की…?

घरातली पत्नी, आई सगळ्यांची खूप काळजी घेते, घरातली सगळी कामं करते, बाहेरचीही कामं करते. मला तिचा खूप आदर आहे. मी तिचं वेळोवेळी कौतुकही करतो, असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा ते घरातल्या 100 कामांपैकी 90 कामं तीच करतेय म्हणून तिचं कौतुक करतोय का? 50-50 जी वाटणी अपेक्षित आहे, त्यापैकी मला 10 च करावे लागतात, म्हणून मी तिचं कौतुक करतोय का? तिच्या मोठेपणामुळे माझं काम कमी होतंय, म्हणून मी तिचं कर्तृत्व मान्य करतोय का? असाही विचार व्हायला हवा. पण आजच्या महिलेला आता हे कौतुकंही नकोसं झालंय. तिला समानता हवीय. कर्तृत्वाचे गोडवे गाऊन उद्याच्या दिवशी पुन्हा सकाळपासून तिला पुन्हा एकदा 100 तली नव्वद कामं करण्यासाठी उभंच रहावं लागत असेल तर या स्तुतीसुमनांनाही काहीच अर्थ नाही.

तुमच्या घरातली स्त्री नाही म्हणू शकते?

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तीनं नेहमीच इतरांसाठी करायचं, कुटुंबासाठी करायचं. घर आवरायचं. स्वयंपाक करायचा. नोकरी असेल, कामावर जायचं असेल तर तेही करायचं. पुन्हा संध्याकाळी आल्यावर घरातलं सगळं पहायचं आणि मग झोपायचं. या सगळ्या गोष्टीत तिला नाही म्हणण्याची काही सोयच नाही. कारण हे सगळं तिनेच करायचंय, हे इतकं समाजाने बिंबवलंय की एखाद्या वेळेस तिने एकदा जरी नाही म्हणलं तरी आता हिला हेही करायला नको वाटतंय, असे टोमणे असतात. नोकरी करत असेल तर आता हिला घरातली कामं जड जातायत, असं म्हटलं जातं. गृहिणी असेल तर निदान घरातली तरी कामं तिनं केलीच पाहिजेत. नाही काय म्हणते, हल्ली हिला काही करायलाच नकोय, असे आरोप केले जातात. पण तिने या सर्वांना कधी नाही म्हणणं आपल्याला पटत नाही. आपण बाहेर जायचा प्लॅन केला आणि तिने नाही म्हणलेलं आपल्याला सहन होत नाही. तिने मात्र प्रत्येक गोष्टीत आपली परवानगी घेतली पाहिजे, असा हट्ट असतो. तिने एखादी गोष्टी नाही म्हटली तर त्यामागची भावना आपण कधी समजून घेतो का?

घरात जुंपलेल्या तिला आपण कधी बाहेर काढलंय?

घरातली सगळी कामं तिनेच करायची, त्यातून वेळ मिळाला तर बाहेरची कामं करायची, हे समाजाने एवढं बिंबवलंय की, अनेक महिलांना बाहेरची खरेदी-विक्री, बँकिंगची, शासकीय कार्यालयातली कामं करण्याचा अनुभव प्रचंड तोकडा असतो. किंबहुना ही सगळी कामं आपली नाहीत. आपण तेवढे सक्षम नाहीत, हुशार नाहीत, अशी महिलांचीच भावना असते. पण आपली सहचारिणी म्हणून किती पुरुषांनी महिलांना स्वतःहून ही कामं शिकवलीत? किती वडिलांनी आपल्या मुलींना याबाबतीत आत्मविश्वास दिलाय. अर्थात मोजक्या घरांमध्ये अपवादही असतात. पण सरसकट विचार करतो तेव्हा महिलांचं आर्थिक साक्षरतेचं प्रमाण कमी का आहे, असा विचार केल्यास त्यात तिला घरातल्या चूल आणि मुलांपासून वेगळी काही कामं करण्याची संधीच दिलेली नसते. कुणी एखादा म्हणत नाही की, तू जा बँकेत. हे काम करून ये, मी घरी मुलं सांभाळतो, घरातल्या जेवणाचं व्यवस्थापन करतो. आजारी आई-वडिलांची सेवा करतो. तू ये बाहेर जाऊन… असं वागणारे पुरुष मात्र नेहमीच समाजाच्या विनोदाचा भाग होतात हे मोठं दुर्दैव!

माध्यमांचीही भूमिका मोठी!

काही गोष्टी स्त्रीयांशी आपण एवढ्या जुंपून ठेवल्यात की स्त्री एक स्वतंत्र व्यक्ती आहे, हेच आपण समजून घेत नाहीत. अनेकदा माध्यमांकडूनही हे नकळतपणे बिंबवलं जातं. उदा. तेलाचे भाव वाढले की सर्रास हेडिंग दिल्या जातात. गृहिणींचे बजेट कोलमडले. का? घरातले सगळ्यांशी ही बाब निगडीत नाही का? तेलाचा वापर ती करते. हे काम समाजानं तिच्यावर लादलंय. अनेक महिलांना ते अंगवळणीही पडलंय. त्यामुळे किचन आणि घर, मुलं सांभाळण्याबाबत असंख्य गोष्टी फक्त महिलांशीच निगडीत आहेत, असं सर्रास गृहित धरलं जातं. घर, कुटुंबव्यवस्था ही तिचीच जबाबदारी आहे, हे समाज मानत असला तरीही आता या सगळ्या गोष्टींसाठी नकार देणाऱ्यांची पिढीही तयार होतेय. हा नकार स्वीकारण्याची ताकद आणि समज समाज म्हणून आपल्यात येणे अपेक्षित आहे.

मुद्दे काढायचेच म्हटले तर खूप निघतील. अगदी घरातल्या छोट्या-छोट्या अनुभवांपासून, रस्त्यावर, दुकानावर, ऑफिसात, बँकेत, सरकारी धोरणांमध्ये, राजकारणात महिलांना ठराविक कक्षेतच जुंपणं आपल्या इतकं अंगवळणी पडलंय की ते उपसून काढण्यासाठी आणखी बऱ्याच पिढ्या जातील. स्त्रीवादी कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून किमान काही टक्के महिलांना स्वतःचं क्षितिज सापडलंय. अनेकांना हवं ते स्थान मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागलाय. स्थान टिकवण्यासाठी काहीजणींचा झगडा सुरु आहे. काहींना इप्सित स्थान खुणावत आहे, पण तिथवर पोहोचू शकत नाहीयेत. काहींना आपल्या या स्थितीत काही बदल घडू शकतो, यावर विश्वासच नाही तर काहींना बाहेरच्या जगात समानता, व्यक्तीस्वातंत्र्य असं काही असतं याची पुसटशी कल्पानाही नाही. त्या अखेरच्या स्त्रीपर्यंत महिला दिन पोहोचेल तोच खरा समानतेचा उत्सव असेल आणि त्याची सुरुवात आपल्या घरापासूनच होते.

इतर बातम्या-

राज्यपालांच्या वक्तव्याचे औरंगाबादेत तीव्र पडसाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात निषेध ठराव मंजूर

Namita Mundada | ‘Beed जिल्ह्यात खुलेआम दारूविक्री, पोलिसांचा धाक राहिला नाही’

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.