Gunratna Sadavarte: सुरक्षेत चूक ठेवणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार; दिलीप वळसे पाटील यांची माहिती

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या घरासमोर एसटी कर्मचाऱ्यांनी उग्र निदर्शने केली. अचानक झालेल्या या हल्ल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे आंदोलन म्हणजे पोलीस यंत्रणेचं अपयश असल्याची टीका गृहखात्यावर होत आहे.

Gunratna Sadavarte: सुरक्षेत चूक ठेवणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार; दिलीप वळसे पाटील यांची माहिती
सुरक्षेत चूक ठेवणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार; दिलीप वळसे पाटील यांची माहिती Image Credit source: ani
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 7:04 PM

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या घरासमोर एसटी कर्मचाऱ्यांनी उग्र निदर्शने केली. अचानक झालेल्या या हल्ल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे आंदोलन म्हणजे पोलीस यंत्रणेचं अपयश असल्याची टीका गृहखात्यावर होत आहे. विरोधकांनीच नव्हे तर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीही गृहखात्यावर हल्ला चढवला आहे. त्यामुळे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. दिलीप वळसे पाटील यांनी या आंदोलनावेळी सुरक्षेत त्रुटी राहिल्याचं कबुल केलं आहे. तसेच या प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. कालच्या घटनेनंतर आज दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांचीही भेट घेतली. या दोन्ही नेत्यांना वळसे पाटील यांनी माहिती दिली. मात्र, यावेळी मुख्यमंत्र्यांनी गृहखात्यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली असून त्यांना या घटनेचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याचं वृत्त आहे.

दिलीप वळसे पाटील यांनी आज मीडियाशी संवाद साधला. कोर्टाने निर्णय दिला आहे. सरकारनेही विलीनीकरणाची मागणी वगळता सर्व मागण्या मंजूर केल्या आहेत. त्यामुळे सहकार्य करून त्यातून मार्ग काढला पाहिजे. एसटी कर्मचाऱ्यांनी शांतता ठेवावी. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. सरकारने आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. उगाच कुणाच्या भडकवल्यामुळे कामगारांनी टोकाची भूमिका घेऊ नये, असं आवाहन दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे.

पवार, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

आज मी शरद पवारांना भेटलो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटलो. काल जो प्रकार घडला त्याला कोण जबाबदार आहे, काल काय त्रुटी राहिल्या आणि पुढे काय निर्णय घ्यायचा यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. या प्रकरणाची चौकशी करू. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात ज्या त्रुटी राहिल्या, त्याला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

तपास करून कारवाई करू

काही कर्मचारी आंदोलनात मद्यप्राशन करून आले होते. त्याबाबत विचारले असता, हा तपासाचा भाग आहे. सर्व माहिती आली आहे. एफआयआरमध्ये आली आहे. त्याचा तपास करून कारवाई करू, असं त्यांनी सांगितलं. सदावर्तेंना कोठडी मिळाली आहे. या प्रकरणाची चौकशी करायची असल्याने सविस्तर बोलणार नाही. कायदा काही त्रुटी झाली त्याची माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई करू, असंही ते म्हणाले.

मी आरोप फेटाळून लावतो

दिलीप वळसे पाटील हे सूडबुद्धीतून कारवाई करत असल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या आरोपात तथ्य नाही. अंदाजपंचे आरोप करत आहेत. पवार आणि माझं नाव घेत आहेत. आरोप करून लोकांच्या समोर राहण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांचे आरोप मी फेटाळून लावतो, असं ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

गुणरत्न सदावर्ते यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं? जाणून घ्या दोन्ही बाजूचा युक्तीवाद

Gunratna Sadavarte: सदावर्तेंना पोलीस कोठडी का दिली?, वकील वासवानी यांनी सांगितलं कोर्टात काय घडलं?

Gunratna Sadavarte : शरद पवार, सुप्रिया सुळेंनी जमिनी बळकावल्या, त्या बाहेर काढल्या, त्याचाच वचपा सरकारने काढला, जयश्री पाटलांचा पवारांवर थेट आरोप

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.