एसटीच्या खासगी हॉटेल थांब्यावर 30 रुपयात नाश्ता मिळतोय का? अधिवेशनात आला प्रश्न, काय निघाले आदेश ?

एसटी महामंडळाच्या अधिकृत हॉटेल थांब्यावर अवघ्या तीस रुपयांत भरपेट नाश्ता देण्याची एसटीची योजना आहे. परंतू या योजनेची योग्य अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार आहे. या संबंधी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लोकप्रतिनिधींंकडून विचारणा झाली आहे. यावरुन आता महामंडळाने अशा हॉटेल थांब्याची झाडाझडती घेण्याचे आदेश काढले आहेत.

एसटीच्या खासगी हॉटेल थांब्यावर 30 रुपयात नाश्ता मिळतोय का? अधिवेशनात आला प्रश्न, काय निघाले आदेश ?
msrtc Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Dec 13, 2023 | 7:40 PM

मुंबई | 13 डिसेंबर 2023 : एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी खाजगी हॉटेल्सना अधिकृत थांबे दिले आहेत. या अधिकृत थांब्यांवर हॉटेल चालकाने एसटीच्या प्रवाशांना 30 रुपयांत चहा-नाश्ता आणि छापिल किंमतीवर एसटीचे अधिकृत नाथजल पिण्याचे बाटली बंद पाणी देणे बंधनकारक आहे. मात्र, प्रत्यक्षात एसटी प्रवाशांना ही सुविधा दिली जात नसल्याची तक्रार नागपूर येथील विधीमंडळ अधिवेशनात लोकप्रतिनिधींकडून वारंवार करण्यात येत आहे. याची दखल घेत एसटी महामंडळाने आता या योजनेची झाडाझडती घेण्याचा निर्णय घेतला आहे. काय आहे नेमका निर्णय चला पाहुयात…

एसटी महामंडळाने तत्कालिन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या कार्यकाळात एसटीच्या खाजगी हॉटेल्सवरील थांब्यामध्ये 30 रुपयांत चहा-नाश्ता देण्याची घोषणा केली होती. या योजनेमुळे प्रवाशांना अत्यंत स्वस्त दरात चहा आणि नाश्ता मिळण्याची सोय झाली होती. परंतू काही हॉटेल चालकांनी या योजनेचे पोस्टर्स योग्य जागी लावले नव्हते. तसेच काही हॉटेलचालकाकडून या योजनेला हरताळ फासला जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. या हॉटेलचालकांना एसटीचे अधिकृत नाथजल हे बाटलीबंद पाणी देखील छापिल किंमतीपेक्षा जादा दरात विकले जात असल्याचे उघडकीस आले होते. या संदर्भात नागपूरातील हिवाळी अधिवेशनात लोकप्रतिनिधीकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक ( नियोजन आणि पणन ) यांनी अशा हॉटेल चालकांनी झाडाझडती घेण्याचे आदेश दिले आहेत.

काय दिले आदेश ?

एसटीच्या अधिकृत थांब्यांवर एसटी प्रवाशांना 30 रुपयांत चहा-नाश्ता आणि नाथजल पिण्याचे बाटलीबंद पाणी उपलब्ध केले जाते का ? याबाबत आता एसटी महामंडळाने विभागीय स्तरावर महिन्यातून किमान दोन वेळा या अधिकृत थांब्याची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. या अधिकृत हॉटेल चालकांकडून एसटीच्या नियमांची पायमल्ली होत असताना दिसल्यास वा अशा स्वरुपाची प्रवाशांची तक्राक प्राप्त झाल्यास त्यांच्यावर तत्काळ प्रभावाने कारवाई करण्यात यावी. तसेच केलेल्या कारवाईबाबतचा अहवाल दर महिन्याच्या अखेर या कार्यालयास सादर करावा असे आदेश एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थापक ( नियोजन आणि पणन ) यांनी सर्व विभाग नियंत्रकांना दिले आहेत. तसेच एसटी चालक जर अनधिकृत हॉटेलावर थांबा घेत असतील तर अशा चालकांवरही कारवाई करण्याचे आदेश एका परिपत्रकाद्वारे काढण्यात आले आहेत.

Non Stop LIVE Update
'मैंने मेरा बाप खोया है, और...', उमेदवारी मिळताच झिशान सिद्दीकी भावूक
'मैंने मेरा बाप खोया है, और...', उमेदवारी मिळताच झिशान सिद्दीकी भावूक.
राज्यात पुन्हा एकदा महायुती येणार? काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
राज्यात पुन्हा एकदा महायुती येणार? काय म्हणाल्या अमृता फडणवीस?.
कंठ दाटला, डोळे पाणावले...जरांगे झाले भावूक; म्हणाले, 'लढा थांबता...'
कंठ दाटला, डोळे पाणावले...जरांगे झाले भावूक; म्हणाले, 'लढा थांबता...'.
यंदा राष्ट्रवादी vs राष्ट्रवादी लढत, ‘या’ मतदारसंघात येणार आमने-सामने
यंदा राष्ट्रवादी vs राष्ट्रवादी लढत, ‘या’ मतदारसंघात येणार आमने-सामने.
'हम तो ऐसे बदनाम है की बदनामी...', गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा
'हम तो ऐसे बदनाम है की बदनामी...', गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा.
'संजयमामा शिंदेंनी सर्वांना फसवलं, त्यांना तोंड...', कोणाचा घणाघात?
'संजयमामा शिंदेंनी सर्वांना फसवलं, त्यांना तोंड...', कोणाचा घणाघात?.
शिंदेंचे आमदार शहाजीबापूं पाटलांचं चॅलेंज, यंदा जिंकू किंवा मरू
शिंदेंचे आमदार शहाजीबापूं पाटलांचं चॅलेंज, यंदा जिंकू किंवा मरू.
'या' दिग्गजांनी भरले अर्ज, कुठे तडगी फाईट अन् कोणी केला विजयाचा दावा?
'या' दिग्गजांनी भरले अर्ज, कुठे तडगी फाईट अन् कोणी केला विजयाचा दावा?.
जरांगेंकडून इच्छुकांच्या भेटीगाठी सुरू असताना धमकी, '10 मिनिटांत...'
जरांगेंकडून इच्छुकांच्या भेटीगाठी सुरू असताना धमकी, '10 मिनिटांत...'.
नवाब मलिक यांना सर्वात मोठा धक्का, अजितदादा गटाचा मोठा निर्णय काय?
नवाब मलिक यांना सर्वात मोठा धक्का, अजितदादा गटाचा मोठा निर्णय काय?.