सत्ता जाऊन दीड वर्ष झाले, तरी सत्ताधाऱ्यांसारखे… आदित्य ठाकरे यांच्यावर या खासदाराने केला हल्लाबोल?

भाजपचे सर्व्हेतून शिवसेनेच्या खासदारांना डच्चू मिळणार अशा काही बातम्या येत आहेत. मात्र, ह्या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. असे प्रकारचे सर्व्हे सर्वच राजकीय पक्ष करत असतात. निवडून येण्याची गणित राजकीय पक्ष काढत असतात. त्यामुळे कुणाचं जागांवर काही फरक पडेल असे वाटत नाही.

सत्ता जाऊन दीड वर्ष झाले, तरी सत्ताधाऱ्यांसारखे... आदित्य ठाकरे यांच्यावर या खासदाराने केला हल्लाबोल?
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Nov 19, 2023 | 6:06 PM

गणेश सोळंकी, बुलढाणा | 19 नोव्हेंबर 2023 : मराठा आरक्षण मिळावे, यासाठी कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. ओबीसींची मागणी सुद्धा रास्त आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आरोप – प्रत्यारोप करून राज्याचे सामाजिक वातावरण बिघडवण्याची शक्यता आहे. आपला हक्क आणि अधिकार प्रत्येकाने मागितला पाहिजे. हे कायद्याचे राज्य आहे याचे पालन करत आपली मागणी रेटावी. ओबीसी विरुध्द मराठा हे दुर्दैवी आहे. एकमेकांना चिथावणी देणारे किंवा महाराष्ट्राचे वातावरण दूषित करणारे वक्तव्य कोणीही करू नये असे शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव म्हणाले आहेत.

उबाठा गट आणि संजय राऊत सह मंडळींना मीडियासमोर राहण्यासाठी काही तरी उचापती सुरू केल्या आहेत. सत्ता जाऊन दीड वर्ष झाले तरी सत्तेतून खाली उतरायला ते तयार नाही. सत्तेची नशा त्यांच्यात भरलेली आहे. सत्तेत नसताना सत्ताधाऱ्यांसारखे विकासकामांचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न करतात. ज्यांचे सरकार आहे तेच विकासकामांचे उद्घाटन करत असतात. आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि आमदार यांची ही स्टंटबाजी आहे. शासनाने यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार जाधव यांनी केली.

नामदेव जाधव व्याख्याते आहेत आणि मराठा आहेत. त्यांनी एका वेबसाईट वरून सर्टिफिकेट काढून व्हायरल केले. यात नामदेव जाधव यांचा काय गुन्हा? जर ओबेसी सर्टिफिकेट फेक असेल तर संबंधित वेबसाईटवर कारवाई करायला पाहिजेत. शरद पवार, रोहित पवार यांनी एकदाच जाहीर करावे, की आम्ही मराठा आहोत की ओबीसी आहोत. त्यानतंर त्या वादावर पडदा पडेल असा टोला जाधव यांनी यावेळी लगावला.

हे सुद्धा वाचा

पुण्यात नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासण्यात ले. हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. याचा आम्ही निषेध करतो. ज्यांनी हे कृत्य केले त्या लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रामाचे दर्शन मोफत हवे असेल तर मतदान करा असे काही म्हटले नाही. चुकीच्या पद्धतीने वाक्य त्यांच्या तोंडी घातले आहे. मोफत दशन होईल हे त्यांनी म्हटले नाही. हे सर्व चुकीच्या पद्धतीने रंगवले जात आहे. कोणतीही नेता असे म्हणू शकत नाही, असेही खासदार जाधव म्हणाले.

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.