यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती कुठे होणार? अंतिम लढतीला कुणाची असणार खास उपस्थिती ?
यंदाच्या वर्षी कुस्तीगीर परिषदेचा वाद अधिकच पेटला असून तडस आणि लांडगे असे दोन गट यामध्ये पाहायला मिळत आहे.
पुणे : आगामी काळात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार हे निश्चित असले तरी महाराष्ट्र केसरी कुस्ती ही स्पर्धा कोण भरवणार? कुस्तीगीर परिषद कोणाच्या ताब्यात असणार? कोणत्या शहरात ही स्पर्धा भरवली जाणार? अशा विविध चर्चा सुरू होत्या. मात्र, तडस गटाने कुस्तीगीर परिषदेवर ताबा मिळवला आहे. तर दुसरीकडे या कुस्तीच्या अंतिम सामन्याला कोणाची उपस्थिती आणि ह्या स्पर्धा कुठे होणार? याची चर्चा सुरू झाली. आणि आता त्याचीही निश्चिती झाली आहे. कुस्तीगीर परिषदेवर ताबा मिळवल्यानंतर भाजप नेते मुरलीधर मोहोळ आणि रामदास तडस यांनी रेसलिंग फेडरेशन ॲाफ इंडियाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांची भेट घेऊन महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या तारखा निश्चित केल्या आहे. त्यानुसार आता मुरलीधर मोहोळ यांच्यासह शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं निमंत्रण दिलं आहे. यामध्ये अंतिम सामन्याला उपस्थिती आणि बक्षीस वितरणासाठी निमंत्रण देण्यात आले आहे.
भाजप महाराष्ट्राचे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना यंदाच्या वर्षी ही संधी मिळाली आहे.
दरवर्षी या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्याला देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असणार आहे.
उपमुख्यमंत्री मा.श्री. @Dev_Fadnavis जी यांची मुंबई येथे भेट घेऊन संस्कृती प्रतिष्ठान आयोजित ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेसाठीचे आमंत्रण दिले. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यासाठी मा. देवेंद्रजींची उपस्थिती लाभणार असून त्यांच्याच शुभहस्ते मानाचा किताब प्रदान केला जाणार आहे. pic.twitter.com/yN2qatDZIv
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) December 15, 2022
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन संस्कृती प्रतिष्ठान आयोजित ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेसाठीचे आमंत्रण दिल्याचे मोहोळ यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती लाभणार असून त्यांच्याच शुभहस्ते मानाचा किताब प्रदान केला जाणार असल्याचे मोहोळ यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे.
यंदाच्या वर्षी कुस्तीगीर परिषदेचा वाद अधिकच पेटला असून तडस आणि लांडगे असे दोन गट यामध्ये पाहायला मिळत आहे.