मराठ्यांना सरसकट आरक्षण देणं शक्य नाही, गिरीश महाजन यांच्या तोंडून भाजपची लाईन?; पडद्यामागे काय घडतंय ?

मनोज जरांगे पाटील याचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु असताना मध्यस्थाची भूमिका बजावण्यासाठी गेलेले सरकारचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मराठा आरक्षणा संदर्भात महत्वाचे वक्तव्य केले आहे. मराठ्यांना सरसकट आरक्षण देता येणार नाही असे त्यांनी म्हटलं आहे. त्यावर आता ही महाजन यांची एकट्याची भूमिका की भाजपची लाईन आहे असा सवाल निर्माण झाला आहे.

मराठ्यांना सरसकट आरक्षण देणं शक्य नाही, गिरीश महाजन यांच्या तोंडून भाजपची लाईन?; पडद्यामागे काय घडतंय ?
girish mahajanImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 04, 2023 | 6:03 PM

मुंबई | 4 डिसेंबर 2022 : मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे यांनी दोन वेळा उपोषण केले आहे. मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात 24 डिसेंबर अशी डेडलाईन सरकारने दिल्यानंतर अलिकडेच मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. दुसरीकडे सरकारचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मराठ्यांना सरसकट आरक्षण देता येणार नाही अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या तोंडून भाजपची भूमिका मांडली जात आहे का ? असा सवाल निर्माण झाला आहे.

मराठ्यांना ओबीसीतून सरसकट आरक्षण देण्याची मागणी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. मराठ्यांना कुणबी सर्टीफिकीटवर ओबीसीतून आरक्षण देण्याची भूमिका जरांगे पाटील वारंवार लावून धरीत आहेत. या मागणीवरुन भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपण तर कुणबी म्हणून आरक्षण केव्हाच घेणार नाही अशी भूमिका एका पत्रकार परिषदेत घेतली होती. यावर आता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे ही मागणी असली तरी हे शक्य नाही. राज्यात ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत, त्यांना प्रमाणपत्र वाटप झाले आहे. मनोज जरांगे त्यांची मागणी मांडत आहेत. हा त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला त्यांना दुखवायचं नाही. ओबीसीचं आरक्षण काढता येणार नाही. मराठ्यांना घाई गडबडीत आरक्षण देऊन त्यांना फसवणूक करायची असं आता होता कामा नये असेही महाजन यांनी म्हटले आहे.

मराठ्यांना सरसकट आरक्षण देता येणार नाही. हे मनोज जरांगे यांच्या जवळच्या लोकांना देखील माहीती आहे. समाजातील अभ्यासक, प्राध्यापक, कुलगुरु विचारवत यांनी सर्वांनी विचार करून ठरविले आहे की सरसकट आरक्षण देता येणार नाही. एससीबीसी कोर्टातून मिळेल. त्यातूनच न्याय मिळेल, कोर्टाने आधी मराठ्यांना आरक्षण नाकारले आहे. त्यावर फेरयाचिका केली आहे. त्यातून समाजाला नक्की न्याय मिळेल असेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

जरांगे यांच्यावर नाराज नाही

मराठ्यांना घाईघाईने आरक्षण देता येणार नाही. घाईघाईने दिलेले आरक्षण कोर्टात टिकणार नाही पूर्वी राणे समितीने दहा दिवसांत आरक्षण दिले होते. कोर्टात ते टिकले नाही. कोर्टाने ते फेटाळून लावले, त्यामुळे आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. त्यासाठी वेळ द्यावा लागेल असेही त्यांनी सांगितले. मनोज जरांगे यांच्यावर आपण नाराज झालो नाही. चार वेळा त्यांच्याकडे गेलो, शेवटच्यावेळी लांब राहीलो असं नाही, मी त्यावेळी बाहेरगावी होतो. त्यामुळे उपोषण सोडायला येऊ शकलो नाही असेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.