राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आयकरची छापेमारी

राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील बडे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या यांच्या घरावर आयकर विभागाने धाडी टाकल्या.

राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आयकरची छापेमारी
Follow us
| Updated on: Jul 25, 2019 | 1:03 PM

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील बडे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर आयकर विभागाने धाडी टाकल्या. आज पहाटे आयकर विभागाची टीम मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कागल येथील निवासस्थानी दाखल झाली. हसन मुश्रीफ यांच्या साखर कारखान्यांवर देखील छापा टाकल्याची माहिती मिळत आहे.

राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असलेले हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्यातील मोठे नेते आहेत. त्यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यातील घरीही छापेमारी

दरम्यान, आयकर विभागाने केवळ कोल्हापुरातच नव्हे तर हसन मुश्रीफ यांच्या पुण्यातील घरीही छापेमारी केली. हसन मुश्रीफ यांचा मुलगा साजिद मुश्रीफ यांच्या कोंढव्यातील घरावर आयकर विभागाने छापा टाकला. मुश्रीफ यांच्या पुण्यातील दोन घरांवर आयकर विभागाने छापे टाकले.  एकूण दोन टीम कोंढाव्यातील घरी आले.  सकाळी 7 वाजल्यापासून घरातील कागदपत्रांची तपासणी केली जात आहे.

आयकर विभागाने नेमक्या कोणत्या कारणास्तव ही छापेमारी केली आहे, याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. गेल्या काही दिवसापासून विविध जिल्ह्यात आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. नगर, औरंगाबादमध्ये आयकर विभागाने शिक्षण संस्थांवर छापे टाकले होते. त्यानंतर आयकर विभागाचा मोर्चा आता कोल्हापूरकडे वळल्याचं आजच्या कारवाईतून दिसून येत आहे.

कोण आहेत हसन मुश्रीफ?

  • हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत
  • ते कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्त्व करतात
  • राष्ट्रवादीचा बडा मुस्लिम चेहरा म्हणून मुश्रीफ यांची पश्चिम महाराष्ट्रात ओळख आहे
  • कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात मुश्रीफ यांचा दबदबा आहे
  • आघाडी सरकारच्या काळात हसन मुश्रीफ यांची मंत्रिपदी वर्णी लागली
  • हसन मुश्रीफ यांनी कामगार मंत्रिपद सांभाळलं
  • 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही त्यांनी विजय मिळवला.

संबंधित बातम्या  

कोल्हापुरातून हसन मुश्रीफांना तिकीट नाहीच! 

महाडिकांचं भाषण मुश्रीफांच्या कार्यर्त्यांनी रोखलं, हात धरुन ओढून पुन्हा भाषणासाठी आणलं  

आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.