लोकसभेत पाडलं आता विधानसभेत काय? बच्चू कडू यांची प्रहार कुणाला देणार टेन्शन?
एनडीएकडून एक एक पाऊल पडत आहे ते माझ्या सोईचे पडत आहे. एकुण विचार केला तर एनडीएने सांभाळून घ्यायला हवे होते. आम्ही ज्या पद्धतीने सोबत राहून मदत केली. एका वर्षात ते दिसून आले आणि त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागले.
लोकसभा निवडणुकीत अचलपूरचे आमदार आणि प्रहर संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी महायुतीची साथ सोडली होती. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या पराभवामागे बच्चू कडू यांची भूमिका महत्वाची होती. आमदार बच्चू कडू यांनी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या बैठकीनंतर एक महत्वाची राजकीय भूमिका जाहीर केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठीही बच्चू कडू यांनी ‘एकला चलो’ची भूमिका घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत पार पडली. आगामी निवडणुकीत महायुतीसोबत राहायचे किंवा महाविकास आघाडीसोबत जायचे की स्वतंत्र लढायचे या संदर्भात बच्चू कडू यांनी ही बैठक बोलावली होती.
पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीत कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या 25 जागा लढवाव्या अशी मागणी केली. मात्र, विचार विनिमय झाल्यानंतर सर्वानुमते 20 जागा लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार बच्चू कडू यांनी जोरदार दंड बैठका मारा. कामाला लागा अशा सुचना केल्या. सप्टेंबरमध्ये आमची भूमिका मांडू. आज भूमिका मांडणार नाही. सध्या महायुतीतच राहणार आहे असे बच्चू कडू यांनी सांगितले.
आम्ही वेगळ लढण्यात पटाईत आहोत, असे सांगून ते पुढे म्हणाले. बच्चू कडू यांना लोकसभेत का घेतले नाही हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा ज्यांनी घेतले नाही त्यांना विचारायला हवा. एनडीएकडून एक एक पाऊल पडत आहे ते माझ्या सोईचे पडत आहे. एकुण विचार केला तर एनडीएने सांभाळून घ्यायला हवे होते. आम्ही ज्या पद्धतीने सोबत राहून मदत केली. एका वर्षात ते दिसून आले आणि त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागले, अशी टीकाही त्यांनी केली.
मुस्लिम धर्मावर आरक्षण कोणी कबूल करणार नाही. त्यांच्यातल्या जातीवर आरक्षण द्यायला हवे. सगळ्यांना समान कायद्या असल्याने कोणत्याही धर्माचा असला तरीही गरीबासोबत सरकारचा न्याय समान असला पाहिजे. अजित पवार यांना भाजपला संभाळून घावे लागेल. लोकशाही राहिली पाहिजे. राज्यात भ्रष्टाचार वाढला आहे. त्यामुळे गब्बर वापस आयोगा असे पत्र आले आहे. आम्ही त्यासाठी भांडतोय असा टोलाही त्यांनी लगावला.
अमरावतीमध्ये आम्हाला 80 हजार मते मिळाली. त्यामुळे आम्ही आशादायी आहोत. भविष्यातही आम्ही अशाच प्रकारे निवडणुका लढवू. विधानसभेच्या 20 जागा लढवण्याचा आमचा मानस आहे. मात्र, निवडणूक अपक्ष लढणार की युतीमधून याचा निर्णय सप्टेंबरला घेणार आहोत. तसेच, जरांगे पाटील यांनी निवडणुक लढवली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. ते 60 ते 70 जागा जिंकू शकतात असेही बच्चू कडू म्हणाले.