मालेगाव : शहरात (Shahid Memorial) शहिद स्मारक उभारले मात्र उद्घाटनाअभावी रखडले अशीच काहीशी अवस्था शहरातील एटीटी हायस्कूल जवळ किडवाई मार्गावर उभारण्यात आलेल्या स्मारकाची झाली होती. तब्बल 17 वर्ष पूर्ण होऊनदेखील याच्या उद्घाटनाला राज्यकर्त्यांना वेळ मिळाला नाही. अखेर एका (Psychopath) मनोरुग्णाने या स्मारकाचे उद्घाटन केले आहे. त्यामुळे जे मनोरुग्णाला कळाले ते (Politics Leader) राजकीय नेत्यांना उमजलेच नाही अशी चर्चा आता शहरात सुरु आहे. स्वतंत्र लढ्यात शाहिद झालेल्या शाहिदाना सन्मान व्हावा त्याअनुशंगाने शहिदाच्या गावात स्मारक उभारले जाते. एका मनोरुग्णाने थेट शाहिद स्मारकाचे उदघाटन केले असे म्हटल्यास त्याच्यावर कोणाचाही सहजपणे विश्वास बसणार नाही मात्र अशी आगळीवेगळी घटना मालेगावात घडली. त्याच्या या कृत्याने राजकारण्यांना सणसणीत चपराक बसली आहे.
स्वतंत्र लढ्यात शाहिद झालेल्या शाहिदांचा सन्मान म्हणून 2005 साली एटीटी हायस्कूल जवळ किडवाई मार्गावर तत्कालीन महापौर असिफ शेख यांच्या कार्यकाळात शहीद स्मारक तयार करण्यात आले होते. परंतू त्यावरुन अनेक समज गैरसमज निर्माण झाले होते. अखेर त्याविषयी तत्कालीन काही नगरसेवक न्यायलायात गेल्याने तो विषय अद्यापही निकाली लागला नाही तसेच स्थानिक राजकारणात राजकारणात स्मारक अडकले होते. त्यामुळे स्मरकावर पोलिसांच्या निगरानित असलेलली सैनिकाची बंदूक आणि हेल्मेट कापडाने झाकून ठेवण्यात आले होते.
गेल्या 17 वर्षांपासून स्मारक उदघाटनाच्या प्रतीक्षेत होते अखेर शनिवारी एका मनोरुग्णाने या स्मरकावर चढून त्याचे केवळ उद्घाटनच केले नाही तर त्याची साफसफाई करून पुष्पहार देखील अर्पण केले.शहीद स्मारकाचे मनोरुग्णाने केलेले उदघाटन चर्चेचा विषय ठरले आहे. त्या मनोरुग्णाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून शहरातील वातावरण बघडवण्याच्या उद्देशाने कुणीतरी जाणीवूर्वक करून घेलले असावे अशी चर्चा आता शहरात रंगली आहे.
एका मनोरुग्णाने हे कृत्य केल्याने शहरात आता वेगवेगळ्या अनुशंगाने चर्चा होऊ लागली आहे. शिवाय त्या मनोरुग्णाला पोलिसांनी देखील ताब्यात घेतले आहे. मनोरुग्णाने घेतलेली भूमिका योग्य असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे तर आता काही नागरिक याच्या चौकशीसाठी कमिटी नेमण्याची मागणी करीत आहेत. त्यामुळे उद्घाटन तर झाले पण नेमके कुणाच्या सांगण्यावरुन याचा शोध घेतला जाणार का हे पहावे लागणार आहे.