हौस म्हणून अलिशान गाडी घेतली, पाहण्यासाठी लोकांची गर्दीही झाली… पण नंतर फजिती झाली
करोडो रुपये किंमतीची लम्बोर्घिनी कंपनीची ही कार चालू होत नव्हती, त्यामुळे एवढी महागडी गाडी चालू का होत नाही ? अशी रस्त्यावरच गाडी बंद का पडली ? अशा चर्चा सुरू झाली होती.

नाशिक : नाशिकमध्ये (Nashik) सध्या एका अलिशान कारची (Car) मोठी चर्चा आहे. खरंतर हौसेला मोल नसतं असे म्हंटले जातं, आणि हौस पूर्ण करण्यासाठी कोण काय करेल यांचा काही नेमही नसतो. मात्र, कधी कधी ही हौस फजितीचे कारण देखील बनत असते. आणि अशीच एक घटना नाशिकमध्ये घडली आहे. सिडकोतील उपेंद्र नगर येथे ही घटना घडली आहे. उपेंद्र नगर परिसरातील रस्त्यावर एक अलिशान कार अवतरली होती. तिला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. करोडो रुपये किंमतीची लम्बोर्घिनी कंपनीची ही कार बघण्यासाठी नागरिक गर्दी करू लागले होते. मात्र, ही कार रस्त्याच्या कडेला उभी असल्याचे पाहून नागरिकांच्या नजरा आपोआप कार कडे वळत होत्या. पण यावेळी कारचालक हा कार चालू करण्याचा प्रयत्न करत होता. पण कार चालूच होत नव्हती, कारची बॅटरी संपल्याचे त्यामध्ये दिसून येत होते.
करोडो रुपये किंमतीची लम्बोर्घिनी कंपनीची ही कार चालू होत नव्हती, त्यामुळे एवढी महागडी गाडी चालू का होत नाही ? अशी रस्त्यावरच गाडी बंद का पडली ? अशा चर्चा सुरू झाली होती.
कारमालक कार चालू करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत होता, पण कार सुरूच होत नव्हती, उपस्थित नागरिकांनी कारचालकाला मदत करण्याची भूमिका घेतली.




त्यावेळी करोडो रुपये किंमतीची लम्बोर्घिनी कंपनीची ही कार चक्क ढकलून चालू करण्याची वेळ आली होती.
यावेळी मात्र, नाशिकच्या खड्ड्यांमुळे बटरीमध्ये लूज कॉन्टॅक्ट झाले असावेत किंवा बघ्यांच्या गर्दीने नजर लागली असावी अशी चर्चा सुरू झाली आहे.
लेम्बोर्गिनी कार म्हटल्यानंतर अनेकांचे डोळेही पानावले मात्र एवढी करोडो रुपये किमतीची कार कशी काय बंद पडली या प्रश्नाभोवती मोठी चर्चा सुरू झाली होती.
उपेंद्र नगर पासून पाथर्डी फाट्यापर्यंत ही कार ढकलण्यात आली. यावेळी अनेक नागरिकांनी कार बघण्यासाठी गर्दी देखील केली मात्र काही नागरिकांना याचे हसू झाले.