मुंबई, दि. 4 जानेवारी 2024 | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. श्रीराम मांसाहारी होते, असे वक्तव्य शिर्डीत त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. संत महात्मांनीही त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अयोध्या येथील जगद्गुरु श्री श्री 1008 जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज प्रचंड संतापले आहेत. त्यांनी आपण स्वंय जितेंद्र आव्हाड यांचा वध करणार असल्याचे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन सुरु आहे.
राज सरकार आणि केंद्र सरकार मिळून जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करावी. सरकार कारवाई करणार नसेल तर “मैं स्वयं उसको मार डालूंगा, हमे चाहे फासी होने दो, संत समाज डरता नही है, इस तरह से अकबर के भक्तो को खुश करने की कोशिश की जा रही है,” असे त्यांनी म्हटले आहे. जितेंद्र आव्हाड यांना संत समाज माफ करणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
हनुमान गढीचे महंत राजुदासजी महाराज यांनी मोठे वक्तव्य केले आहे. जितेंद्र आव्हाड हे राक्षसी प्रवृत्तीचे आहेत. त्यांना चप्पलाच हार घालून पक्षातून हाकलून द्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर कारवाई करावी. जितेंद्र आव्हड जिथे जातील तिथे हिंदू त्यांना चपलाचा हार घालतील. उद्धव ठाकरे यांनी रामद्रोही असणाऱ्या या पक्षासोबत सरकार बनवले. त्यांनी महापाप केले आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाचं नाव, चिन्ह, फंड त्यांच्याकडून गेले. आता ते विरोधी पक्षाच्या क्षमतेचे राहिले नाहीत. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची मानसिकता काही कळत नाही. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या वडिलांच्या विचारांपासून फारकत घेतली आहे.
नाशिकमध्ये महंत सुधीरदास यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी आमची मागणी केली आहे. तसेच देशात इशनिंदा कायदा करावा, अशी मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर येत आहे. त्यावेळी आम्ही ही मागणी करणार आहोत. जितेंद्र आव्हाड यांनी काल नशा केली होती का ? त्यांचे 100 अपराध भरले आहे, असे त्यांनी म्हटले.
पुणे शहर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. प्रभू रामचंद्रांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आला. अलका चौकात आंदोलन करुन त्यांची तिरडी काढली.