Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झारखंड सरकारचा एक निर्णय, जैन समाज बांधव एकवटले, महाराष्ट्रात ठिक-ठिकाणी निषेध आंदोलनं

पुण्यात आज जैन समाजाच्या व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेऊन निर्णयाचा निषेध केला. व्यापारी महासंघातील जैन व्यापारी भारत बंदमध्ये सहभागी झालेत.

झारखंड सरकारचा एक निर्णय, जैन समाज बांधव एकवटले, महाराष्ट्रात ठिक-ठिकाणी निषेध आंदोलनं
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 21, 2022 | 4:06 PM

मुंबईः झारखंड (Jharkhand) राज्यातील जैन धर्मियांचे धर्मस्थळ असलेल्या सम्मेद शिखरास झारखंड सरकारने नुकतेच पर्यटन स्थळ (Tourism place) म्हणून घोषित केले. पर्यटन स्थळ जाहीर केल्याने सम्मेद शिखराचे पावित्र्य धोक्यात येईल, असा इशारा जैन सामाजाच्या (Jain Community) वतीने देण्यात आला आहे. काल झालेल्या या निर्णयांनंतर झारखंड, महाराष्ट्र, मध्यप्रदेशातील जैन समाजबांधव या निर्णयाविरोधात एकवटले आहेत. महाराष्ट्रात आज जैन समाजाने बंदची हाक दिली होती.

नाशिक, सांगली, सोलापूर, जळगाव आदी ठिकाणी जैन बांधवांनी निषेध मोर्चा काढला. तसेच विविध ठिकाणी प्रमुख बाजारपेठा बंद ठेवत आंदोलनाला प्रतिसाद देण्यात आला.

जळगावात माजी मंत्री सुरेश जैन यांच्या नेतृत्वात…

जळगावमध्ये जैन समाजाच्या वतीने काळया फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देऊन सम्मेद शिखर पर्यटन स्थळ न करता धर्मस्थळ करण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी माजी मंत्री सुरेश जैन हे देखील जैन समाज बांधवांसोबत सहभागी होऊन सुरेश जैन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

संसदेत मुद्दा मांडला

शिंदे गटाचे खासदार श्नीरंग बारणे यांनी जैन समाजाचा मुद्दा संसदेत मांडला. समाजाच्या भावनांचा आदर करून तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून जाहीर करू नका, अशी विनंती केली.

पुण्यातही दुकाने बंद

पुण्यात आज जैन समाजाच्या व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेऊन निर्णयाचा निषेध केला. व्यापारी महासंघातील जैन व्यापारी या भारत बंदमध्ये सहभागी झालेत.

धुळ्यातही निषेध

धुळे शहराचा संपूर्ण जिल्हाभरातील जैन धर्म समाज बांधवांनी एकत्र येत काळ्याफिती लावून झारखंड सरकारच्या निर्णयाचा निषेध केला.

सोलापुरात घोषणाबाजी

सोलापूरच्या माढ्यात जैन बांधवानी भव्य असा शहरातून मूक मोर्चा काढला. या मोर्चात बहुजन समाज बाधवांनी पाठिंबा दर्शवला. लहान मुलासह महिलांनी जय जिनेंद्रचा जयघोष करीत झारखंड सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप.
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप.
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा.
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश.
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण.
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर.
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?.