पाणीपुरी महागात पडली, जळगावात तब्बल 80 जणांना विषबाधा

पाणीपुरी खाणं हा बहुतेकांचा वीक पॉईंट असतो. पाणीपुरी खायला आवडत नाही अशी व्यक्ती दुर्मिळचं असेल. पण हीच पाणीपुरी खाणं जळगावच्या चोपडा गावातील लोकांना फार महागात पडलं. आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने सुमारे 80 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना जळगावच्या चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे घडली.

पाणीपुरी महागात पडली, जळगावात तब्बल 80 जणांना विषबाधा
Follow us
| Updated on: Jun 19, 2024 | 8:37 AM

पाणीपुरी खाणं हा बहुतेकांचा वीक पॉईंट असतो. पाणीपुरी खायला आवडत नाही अशी व्यक्ती दुर्मिळचं असेल. पण हीच पाणीपुरी खाणं जळगावच्या चोपडा गावातील लोकांना फार महागात पडलं. आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने सुमारे 80 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना जळगावच्या चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे घडली. विषबाधा झालेल्या नागरिकांमध्ये काही लहान मुलांचाही समावेश आहे. चोपडा तालुक्यातील पिंप्री, चांदसणी कमळगाव येथील रुग्णांचां समावेश असून पाणीपुरी खाल्ल्यानंतर त्यांना उलट्या, जुलाब, पोटदुखी असा त्रास झाला. त्यांच्यावर नजीकच्या अनेक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे सोमवारी आठवडी बाजार होता. त्यामुळे कमळगाव येथे चांदसणी, मितावली, पिंप्री तसेच आजूबाजूच्या खेड्यांतील ग्रामस्थ बाजारासाठी आले होते. आजूबाजूच्या परिसरातील अनेक गावकरी या बाजारासाठी आले होते. त्यापैकी काही जणांनी बाजारातील पाणीपुरी विक्रेत्याकडे जाऊन पाणीपुरीचा आस्वाद घेतला. तर काहींनी घरी खायला पार्सल नेले. मात्र त्यानंतर काही वेळातच अनेक लोकांना त्रास होऊ लागला. अनेकांना मंगळवारी सकाळी उलट्या, जुलाब, पोट दुखण्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात धाव घेतली. सुमारे 80 जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले. यामध्ये लहान मुलांची संख्या सर्वाधिक असल्याचं समजतय. आतापर्यंत जवळपास ८० हून अधिक रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

त्यानंतर ७० पैकी ३० रुग्णांना चोपडा येथे उपजिल्हा रुग्णालयात तसेच इतर रुग्ण खासगी व जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. रात्री सुमारे १० रुग्णांवर अडावद येथे उपचार सुरू होते. पाणीपुरीमुळे त्रास झाल्याबाबत सोमनाथ जगन कोळी (रा. पिंप्री) यांनी पोलिस स्टेशनला लेखी जबाब दिला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत शिवसेनेचे आमदार लता सोनवणे यांनी तातडीने रुग्णालय गाठले आणि रुग्ंणाची विचारपूस केली. तसेच घडलेल्या घटनेची माहिती जाणून घेत रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य ते उपचार करण्याच्या सूचना केल्या.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.