शुद्ध सोने मिळणारी सुवर्णनगरी म्हणून ख्याती असलेला जिल्हा जळगाव. पूर्वी या भागाला पूर्व खानदेश असेही नाव होते. जिल्ह्यातील केळीदेखील देश-विदेशात प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे ठिबक सिंचन पद्धतीवर पिकवली जाणारी केळी आणि कापसाची शेती ही संपूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी आदर्श उदाहरण आहे. भारतातील सर्वाधिक केळी उत्पादक जिल्हा म्हणून जळगावची ख्याती आहे. येथील जिनिंग व प्रेसिंग, साखर कारखाने, रेशीम कापडनिर्मितीसह वरणगाव व भुसावळ येथील युद्धसाहित्य निर्मिती, अन्नप्रक्रिया उद्योग प्रसिद्ध आहे. जळगावचे क्षेत्रफळ 11,700 चौरस किलोमीटर असून येथील लोकसंख्या 3 कोटी 67 लाख 9,936 एवढी आहे. जिल्ह्यात एकूण 15 तालुके असून त्यात अंमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, चोपडा, जळगाव तालुका, मुक्ताईनगर, जामनेर, धरणगाव, पाचोरा, पारोळा, बोदवड, भडगाव, भुसावळ, यावल व रावेर अशी आहेत. जळगाव जिल्ह्यात एक महापालिका असून 13 नगरपालिका आहेत. जिल्ह्यात 15 पंचायत समित्या आहेत. जळगावमध्ये एक लोकसभा मतदार संघ तर सहा विधानसभा मतदार संघ आहे. यात जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, पाचोरा या विधानसभा मतदार संघांचा समावेश होतो. महाराष्ट्राच्या राजकारणात जळगावचे महत्त्व असून भारताच्या इतिहासातील पहिल्या स्त्री राष्ट्रपती प्रतिभा पाटील यादेखील जळगाव जिल्ह्यातील आहेत. जिल्ह्यात खास बोलली जाणारी अहिराणी ही बोली भाषा प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी या जळगाव जिल्ह्यातील होत्या. बहिणाबाईंच्या स्मरणार्थ जळगाव येथील विद्यापीठाचे नाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ठेवण्यात आले. बालकवी त्र्यंबक बापुजी ठोंबरे हेदेखील जळगाव जिल्ह्यातील होते.
जळगाव जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही9 मराठीच्या साईटला आवर्जून भेट द्या.
पुढे वाचा