जळगावात कोरोनाचा कहर, आणखी 36 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना जळगावात कोरोनाचा कहर पाहायला मिळत (Jalgaon Corona Cases Update) आहे.

जळगावात कोरोनाचा कहर, आणखी 36 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
Follow us
| Updated on: Jun 05, 2020 | 5:20 PM

जळगाव : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना जळगावात कोरोनाचा कहर पाहायला मिळत (Jalgaon Corona Cases Update) आहे. जळगाव जिल्ह्यात आज आणखी 36 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 907 वर पोहोचला आहे. तर 107 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नव्याने पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील 7, भुसावळ 7, अमळनेर 4, यावल 1, एरंडोल 2, जामनेर 3, जळगाव ग्रामीण 1, रावेर 5, पारोळा 5, अशा रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 429 रुग्ण हे बरे होऊन घरी गेले आहेत. तर 365 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

लॉकडाऊननंतर तब्बल 75 दिवसांनी जळगावातील सोनेबाजार सुरु झाला आहे. पहिल्याच दिवशी सोने खरेदीसाठी ग्राहकांनी प्रतिसाद दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात हळूहळू शिथिलता दिली गेली आहे. मात्र तरीही दुकाने सुरू करताना सम-विषम पद्धतीने सुरू होणार आहे. त्यानुसार दुकानदारांना एक दिवसाआड दुकाने उघडावी लागणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या दरम्यान दुकाने उघडी असतील.

मात्र संकुलातील दुकानं उघडण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. शहरातील बहुतांश दुकाने मात्र व्यापारी संकुलात असल्याने त्यांच्यापुढे व्यवसायाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात हॉटेल, मद्य विक्रीला परवानगी नसल्याने हे व्यावसायिकही हवालदिल झाले आहेत.

जळगाव शहर हे महाराष्ट्रातील मुख्य बाजारपेठ आहे. जळगावात जवळपास 14 ते 15 हजार छोटे मोठे व्यापारी आहेत. मागील दोन महिन्याच्या लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक गोष्टी सोडून इतर व्यापार हा बंद होता.

लॉकडाऊनच्या या दोन महिन्यात जवळपास 8 ते 10 हजार कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प झाला आहे. व्यापाऱ्यांचे जवळपास 500 कोटीच्या नफ्याचे नुकसान झाले आहे. पण कोविड 19 हे मोठं संकट असल्याने व्यापाऱ्यांनी आपल्या नफा-नुकसान न बघता दुकाने बंद ठेवली होती. ग्राहकांचे आरोग्य महत्वाचे असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला होता. पण त्यानंतर आज पुन्हा बाजार सुरू झाला आहे. त्यानुसार आम्ही परत एक उभारी घेऊ आणि सर्व व्यापार हा पुर्ववत होईल अशी खात्री व्यापाऱ्यांनी व्यक्त केली (Jalgaon Corona Cases Update) आहे.

संबंधित बातम्या : 

‘कोरोना’ने आठ दिवसांच्या बाळाचं मातृछत्र हिरावलं

नागपुरात दोघा ‘सारी’ग्रस्त रुग्णांचा ‘कोरोना’ने मृत्यू

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.