शरद पवार यांनी पक्षात घेतलं नसतं, तर मी राजकारणातून बाद झालो असतो – एकनाथ खडसे

शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे आज मुक्ताईनगरमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिल्याबद्दल शरद पवार यांचे आभार मानले. तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं.

शरद पवार यांनी पक्षात घेतलं नसतं, तर मी राजकारणातून बाद झालो असतो - एकनाथ खडसे
Follow us
| Updated on: Oct 25, 2020 | 2:33 PM

जळगाव: शरद पवार यांनी मला पक्षात घेतलं नसतं तर मी राजकारणातून बाद झालो असतो. तशी परिस्थितीच माझ्यावर आणली होती, अशी उद्विग्न प्रतिक्रिया भाजपला राम-राम ठोकून नुकतेच राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे यांनी दिली आहे. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे आज मुक्ताईनगरमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी खडसे यांचं ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये स्वागत करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना खडसे यांनी पवारांचे आभार मानताना भाजपवर जोरदार हल्ला चढवला. (Jalgaon Eknath Khadse on Sharad Pawar and Devendra Fadnavis)

शरद पवार यांनी मला पक्षात घेतलं नसतं तर मी राजकारणातून बाद झालो असतो. तशी वेळ माझ्यावर आणली गेली होती. मी जर राजकारणातून बाहेर गेलो असतो तर माझं नाही, पण तुमचं नुकसान झालं असतं, असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं. जळगावात ८० टक्के समर्थक माझे आहेत आणि उरलेले २० टक्के हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. येत्या काळात माझी काय ताकद आहे ते दाखवून देईन, असं थेट आव्हान खडसे यांनी भाजप नेत्यांना दिलं.

मला मंत्रिपदावरुन का काढण्यात आलं हे अजून सांगितलं नाही. पद येतात पद जातात पण झालेल्या अन्याय, अपमान विसरला जाणार नाही, अशी भावना खडसेंनी व्यक्त केली. माझं तिकीट कापून रोहिणीताईंना दिलं आणि काही गद्दारांनी पाडण्यासाठी कटकारस्थानं केल्याचा गंभीर आरोप खडसेंनी केलाय. याप्रकरणात सगळे पुरावे चंद्रकांत पाटील यांना दिले. मात्र, दहा महिन्यानंतरही कुणावर कारवाई झाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीत माझ्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा ए बी फॉर्म होता, पण मी तो स्वीकारला नाही. तो फॉर्म घेतला असता तर रोहिणीताई आणि माझ्यात भांडण लावलं गेलं असतं, असंही खडसे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांची प्रवृत्ती ‘हम करे सो कायदा’

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. फडणवीस यांची प्रवृत्ती ‘हम करे सो कायदा’ अशी आहे. भाजपमध्ये सध्या एकाधिकारशाही सुरु असल्याची टीका खडसे यांनी केली.

संबंधित बातम्या:

देवेंद्र फडणवीस यांची प्रवृत्ती ‘हम करे शो कायदा; खडसेंचा फडणवीसांवर पुन्हा हल्ला

..तर राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष होण्यास उशीर लागणार नाही- खडसे

भाजप खासदार असलेल्या सुनबाईंनी केलं राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसेंचं स्वागत

Jalgaon Eknath Khadse on Sharad Pawar and Devendra Fadnavis

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.