Jalgaon Gram Panchayat Election Results 2021 | जळगाव ग्रामपंचायतीत जोरदार लढत, जेलमध्ये असलेला उमेदवार विजयी
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बक्षिपूर ग्रामपंचायतीत जोरदार लढत पाहायला मिळाली. (Jalgaon Gram Panchayat Election Results 2021)
जळगाव : महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी सुरु आहे. जळगाव ग्रामपंचायत निवडणुकीत जेलमध्ये असलेला उमेदवार विजयी झाला आहे. स्वप्निल मनोहर महाजन असे या उमेदवाराचं नाव आहे. (Jalgaon Gram Panchayat Election Results 2021)
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बक्षिपूर ग्रामपंचायतीत जोरदार लढत पाहायला मिळाली. या लढतीत जेलमध्ये असलेला उमेदवार विजयी झाला. स्वप्निल मनोहर महाजन असे त्यांचे नाव आहे.
स्वप्निल महाजन या उमेदवाराने जेलमधून ग्रामपंचायतीच्या निवडणूक लढवली होती. रावेर शहरात जनता कर्फ्यूवेळी दोन गटात दंगल झाली होती. या दंगलीत बक्षिपूर येथील माजी सरपंच स्वप्निल महाजन यांना अटक झाली होती. तेव्हापासून ते जेलमध्येच आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर स्वप्निल महाजन यांच्या भावाने त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
जळगाव ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल
जळगाव जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतींमध्ये प्रस्थापित गावनेत्यांना पराभूत व्हावे लागले आहे. तर, अनेक नवे चेहरे ग्रामपंचायतीच्या कारभारात दाखल झाले आहेत. अनेक ठिकाणी दिग्गजांचे पॅनल पराभूत झाले. शिवसेनेचे नेते तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजपचे नेते आणि माजीमंत्री गिरीश महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आपआपल्या मतदारसंघातील ग्रामपंचायतींवर वर्चस्व राखल्याचे दावे केले आहेत. (Jalgaon Gram Panchayat Election Results 2021)
एकनाथ शिंदेंच्या रणनितीचा फायदा, चंद्रपूर, गोंदिया, भंडाऱ्यात शिवसेनेची जोरदार मुसंडीhttps://t.co/67ycHmJjrK#EknathShinde #Shivsena #Chandrapur #Gondia #Bhandara #GramPanchayatElectionResults @mieknathshinde @ShivSena
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 18, 2021
संबंधित बातम्या :