मजूर चालून चालून थकले, भुकेने वाट रोखली, जळगावात उपासमारीने दोघांचा मृत्यू, एकाची पू्र्णा नदीत उडी

लॉकडाऊनचे भयाण वास्तव समोर येत आहे. मुंबईतून उत्तर प्रदेशाकडे चालत निघालेल्या दोन मजुरांचा उपासमारीने मृत्यू झाला आहे. (Jalgaon labour starvation)

मजूर चालून चालून थकले, भुकेने वाट रोखली, जळगावात उपासमारीने दोघांचा मृत्यू, एकाची पू्र्णा नदीत उडी
Follow us
| Updated on: May 15, 2020 | 1:22 PM

जळगाव : लॉकडाऊनचे भयाण वास्तव समोर येत आहे. मुंबईतून उत्तर प्रदेशाकडे चालत निघालेल्या दोन मजुरांचा उपासमारीने मृत्यू झाला आहे. (Jalgaon labour starvation) तर एका मजुराने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. जळगावातील मुक्ताईनगरजवळ ही धक्कादायक घटना घडली. उपाशीपोटी चालून थकलेल्या या मजुरांचा धीर सुटला आणि त्यांचा भुकेने बळी घेतला. (Jalgaon labour starvation)

नुकतंच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी उपासमारीने किंवा भुकेने कोणत्याही मजुराचा मृत्यू होणार नाही असं आश्वासन दिलं होतं. मात्र गोयल यांच्या आश्वासनाच्या काही तासातच जळगावात ही धक्कादायक घटना घडली.

मुंबईवरुन उत्तर प्रदेशच्या दिशेने असंख्य मजूर वाट काढत आहेत. मिळेल त्या वाहनाने प्रसंगी चालत हे मजूर गाव गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. जळगावपर्यंत उपाशीपोटी चालत गेलेले हे मजूर इतके थकले की त्यांचा मृत्यू झाला. तर एका मजुराने थेट पूर्ण नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. या मजुराने उपासमारीला कंटाळून पुलावरुन उडी मारून नदीच्या पात्रात आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

हे मजूर अनेक दिवसांपासून पायी घरी परतत आहेत. वाटेत मिळेल ते खायचं, काही मिळालं नाही तरी तसंच चालायचं, असं करत करत हे मजूर जळगावपर्यंत पोहोचले होते. मात्र त्यांची वाट भुकेने रोखली आणि तिथेच ते हरले.

आठ मजुरांचा अपघातात मृत्यू

पायी जाणाऱ्या मजुरांवर यापूर्वीही अनेक संकटं ओढावली आहेत. कालच लॉकडाऊनच्या काळात परराज्यात अडकल्यामुळे घराची वाट धरणाऱ्या मजुरांवर पुन्हा काळाने घाला घातल्याचं वृत्त समोर आलं होतं. महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशला निघालेल्या स्थलांतरित मजुरांच्या ट्रकला मध्य प्रदेशात अपघात झाला. यामध्ये आठ जणांना प्राण गमवावे लागले. उत्तर प्रदेशमध्ये बसखाली चिरडून सहा मजुरांचा मृत्यू झाला.

कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊन दरम्यान घरी परतणाऱ्या देशभरातील कामगारांचे अपघात होण्याच्या घटना समोर येत आहेत. औरंगाबादमध्ये रेल्वेखाली चिरडून 16 मजुरांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना होऊन आठवडाही उलटला नसताना यूपी-एमपीमध्ये घडलेल्या घटनेने देश हादरला आहे.

हेही वाचा : Aurangabad Train Mishap | औरंगाबादच्या जीवघेण्या रेल्वे ट्रॅकवर नेमकं काय घडलं?

मालवाहू ट्रेनखाली चिरडून 16 मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये गेल्या शुक्रवारी घडली. रात्रीच्या वेळेस रेल्वे रुळावरच विश्रांती घेण्यासाठी झोपलेल्या मजुरांचा पहाटेच्या सुमारास करुण अंत झाला. जालन्यातील स्टील कंपनीत काम करणारे मजूर मूळचे मध्य प्रदेशातील रहिवासी होते.

संबंधित बातम्या  

महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशला निघालेले आठ मजूर अपघातात बळी, तर यूपीत सहा मजुरांना बसने चिरडले

Kolhapur migrant workers | कोल्हापुरात परप्रांतिय मजुरांचा उद्रेक, हजारो मजूर रस्त्यावर

Nirmala Sitharaman | स्थलांतरित मजूर, शेतकरी ते फेरीवाले, निर्मला सीतारमण यांच्या कोणासाठी कोणत्या घोषणा?

' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.