लग्नाची वरात, कोव्हिड हॉस्पिटलच्या दारात, नवरदेवासह बाप, भाऊ-भावजय पॉझिटिव्ह, वऱ्हाडी क्वारन्टाईन!

जळगाव तालुक्यातील एका लग्नाने प्रशासनाची चिंता वाढवली आहे. नवरदेव, नवरदेवाचे वडिल, नवरदेवाचे भाऊ-भावजय यांना कोरोनाने गाठलं आहे.  (Jalgaon Wedding Groom Corona Positive)

लग्नाची वरात, कोव्हिड हॉस्पिटलच्या दारात, नवरदेवासह बाप, भाऊ-भावजय पॉझिटिव्ह, वऱ्हाडी क्वारन्टाईन!
जळगावच्या लग्नात कोरोनाचा धुमाकूळ...
Follow us
| Updated on: Feb 21, 2021 | 1:47 PM

जळगाव : राज्यातील कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. अशातच जळगाव तालुक्यातील एका लग्नाने प्रशासनाची चिंता वाढवली आहे. नवरदेव, नवरदेवाचे वडिल, नवरदेवाचे भाऊ-भावजय यांना कोरोनाने गाठलं आहे.  (Jalgaon Wedding Groom Corona Positive)

जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात विवाह सोहळ्यानंतर नवरदेवासह त्याचे वडील, भाऊ, भावजयी आणि अन्य एक जण असे पाच जण कोरोना बाधित निघाले आहेत. शिरसोली गावात दोन दिवसात सात बाधित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

16 फेब्रुवारीला विवाह सोहळा आटोपल्यानंतर नवरदेवासह त्याच्या नातेवाईकांना कोरोना सदृश्य आजाराची लक्षणे जाणवू लागली. त्यांनी तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

कोरोनाने बाधित असलेल्या सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरु केले आहेत. तसंच संशयित असलेल्या सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

वऱ्हाडींची चिंता वाढली

या लग्नातील नवरदेवच कोरोनाबाधित आढळल्याने अख्ख्या वऱ्हाडीची चिंता वाढली आहे. आपण तर कोरोना पॉझिटिव्ह येत नाही ना? अशी भीती लग्नाला आलेल्या प्रत्येकाला वाटू लागली आहे. या लग्न समारंभातील चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तसंच संशयितांना रुग्णालयात दाखल केल्याने प्रशासनाला धडकी भरली आहे.

हे ही वाचा :

Wardha Corona | पिपरीच्या लग्नाने प्रशासन त्रस्त, नवरी, नवरदेवाची आई आणि दोन वऱ्हाड्यांना संसर्ग

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.