भयानक अपघात..! रेल्वे आली आणि सगळच संपलं; एकाचवेळी गुराख्यासह 10 जनावरं चिरडली
रानातून घरी जनावरं आणत असताना रेल्वेलाईनजवळ जनावरं आली असतानाच रेल्वेच्या आवाजामुळे बिथरल्यामुळे जनावरं रेल्वेखाली येऊन ठार झाली आहेत.
चाळीसगाव/खेमचंद कुमावत : धुळ्याहून चाळीसगावकडे जाणाऱ्या मेमो ट्रेनला चाळीसगाव तालुक्यातील शिदवाडी गावाजवळ अपघात झाला. शिदवाडी येथील राजेंद्र सूर्यवंशी गुरे चारून घरी परतत असताना अचानक गुरे रेल्वेसमोर आल्याने रेल्वेच्या धडकेत 5 गाई, 1 म्हैस व 1 वासरू अशी सात जनावरे ठार झाली. तर यामध्ये गुराखी राजेंद्र भीमराव सूर्यवंशी यांचाही जागीच मृत्यू झाला आहे.
या भीषण अपघातात अक्षरशः काही जनावरे रुळापासून लांब फेकली गेली तर काही जनावरे रेल्वे खाली अडकली होती. अपघातानंतर सुमारे एक तास मेमो ट्रेन घटनास्थळी थांबून होती. रेल्वे खाली अडकलेली जनावरे काढल्यानंतर रेल्वे पुन्हा चाळीसगावकडे रवाना करण्यात आली.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर रेल्वे थांबवण्यात आली होती. रेल्वेखाली जनावरं आल्यामुळे अपघातानंतरचे दृश्य पाहून अनेक जणांचा थराकप उडणारा होता. कारण अनेक जनावरं रेल्वेखाली आल्याने त्यांची शरीर छिन्नविछिन्न झाली होती.
या अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करून मृत व्यक्तीचा मृतदेहही शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
या अपघाताची पोलिसांना माहिती दिली असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. अनेक या अपघातात गुराख्याचाही मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रेल्वेखाली जनावरं आल्यानं आणि अपघातानंतर ती गाडीखाली अडकून पडल्याने रेल्वे थांबवण्यात आली होती. या अपघातामुळे काही रेल्वेंच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. रेल्वेखाली अडकलेली जनावरं काढून झाल्यानंतर रेल्वे पुन्हा मार्गस्थ करण्यात आली.
रेल्वेखाली जनावरांचा मृत्यू झाल्याचा अपघाताचे वृत्त परिसरात पसरताच बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती. अपघातानंतर यावेळी काही नागरिकांनी आणि कर्मचाऱ्यांनी रेल्वेखाली आलेली जनावरं बाहेर काढण्यासाठी मदत करण्यात आली.