60 वर्षीय आजोबा, 59 वर्षीय आजी; असे जुळून आले तार

| Updated on: Mar 03, 2023 | 5:10 PM

या दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या विवाहासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही पुढाकार घेतला. मोठ्या थाटात हा विवाह सोहळा संपन्न झाला.

60 वर्षीय आजोबा, 59 वर्षीय आजी; असे जुळून आले तार
Follow us on

जळगाव : एका लग्नाची दुसरी गोष्ट, असा काहीसा अनोखा विवाह सोहळा झाला आहे. या विवाह सोहळ्यात 60 वर्षीय आजोबांनी बेघर निवारा केंद्रातील 59 वर्षीय आजी सोबत लग्नगाठ बांधली. एकमेकांना आधार देण्यासाठी नव्या संसाराला सुरुवात केली आहे. धरणगाव येथील एडवोकेट हरिहर पाटील यांच्या पत्नीचे डिसेंबरमध्ये निधन झाले. हरिहर पाटील हे स्वतः दृष्टी दोषामुळे त्रस्त आहेत. त्यामुळे मुलींच्या विवाहानंतर पुढील आयुष्यासाठी हरिअर पाटील यांना आधाराची गरज होती. यातूनच बेघर किंवा अनाथ महिलेशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. हरिहर पाटील यांनी जळगाव महापालिकेच्या बेघर निवारा केंद्रातील मीना चौधरी या आजीशी भेट घेतली. त्यानंतर दोघांचीही मनं जुळून आली. त्यामुळे त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला.

एकमेकांच्या आधारासाठी

या दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या विवाहासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही पुढाकार घेतला. मोठ्या थाटात हा विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्यासाठी महापौर जयश्री महाजन यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी देखील उपस्थित होते. एकमेकांना आधार देण्यासाठी आपण विवाह बंधनात अडकले असल्याची प्रतिक्रिया यावी या नवविवाहित आजी-आजोबांनी दिली आहे.

समाजाची भीती मागे पडते

ज्येष्ठ झाल्यानंतर खऱ्या अर्थानं साथीदाराची गरज पडते. सुख-दुःख समजून घेण्यासाठी कुणीतरी पाहिजे असते. पती किंवा पत्नी गेल्यानंतर ज्येष्ठ नागरिक एकाकी पडतात. पण, या वयात लग्न केल्यास समाज काय म्हणेल अशी भीती असते. मात्र, या सर्व बाबी आता मागे पडत आहेत. सुशिक्षितच नव्हे तर काही कमी शिकलेले लोकंही एकत्र येण्याचा प्रयत्न करतात. असंच काहीस या नवदाम्पत्याबाबत घडलं.