प्रतिनिधी, जळगाव : उन्हाचे दिवस असल्याने बहुतेक सर्वांनी कुलर काढले. एसी प्रत्येकाला परवडत नाही. १० टक्के लोकांकडे एसी असेल. तर, ८० टक्के लोकांकडे कुलर आहे. बाकीचे पंख्यावर तर कुणी बिना पंख्याने दिवस काढणारेही लोकं आहेत. कुलरमध्ये आपण पाणी टाकतो. काही कुलर यामुळे करंट देतात. त्यामुळे कुलरपासून सावध असणे गरजेचे आहे. दरवर्षी उन्हाळा आला की, कुलरच्या शॉकने मृत्यूच्या बातम्या येतात. अशीच एक दुःखद घटना मुक्ताईनगरमध्ये घडली.
वैष्णवी या ९ वर्षीय मुलीचा शुक्रवारी वाढदिवस होता. वाढदिवसाची वाट मुलं आतुरतेने पाहत असतात. आपला वाढदिवस कसा साजरा करायचा याचे प्लान्स तयार केले जातात. वैष्णवीनेही आपल्या ९ व्या वाढदिवासाचे प्लान्स तयार केले होते. घरात सर्वत्र धामधूम होती.
वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी ही धावपळ सुरू होती.
पण, अशात एक धक्कादायक घटना समोर आली. वैष्णवी चुकून कुलरजवळ गेली. तिला कुलरचा शॉक बसला. यात तिचा मृत्यू झाला. यामुळे वाढदिवसाचा दिवस हाच वैष्णवीचा शेवटचा दिवस ठरला. घरात सर्वत्र शोकाकूल वातावरण झाले.
मुक्ताईनगर येथील जिजाऊनगर प्रभाग क्रमांक १२ मधील घटना. वैष्णवीचा ९ वा वाढदिवस होता. सायंकाळी सर्व कुटुंबीय बालिकेचा वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन करत होते. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास कुलरचा जबरजस्त शॉक बसला. यात वैष्णवीचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली.
मुक्ताईनगर शहरातील प्रभाग क्रमांक १२ मधील जिजाऊ नगरमध्ये ही घटना घडली. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. वैष्णवी चेतन सनान्से असं मृतक मुलीचं नाव आहे. वैष्णवीचा शुक्रवारी कुलरचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे मुक्ताईनगर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
वैष्णवी फक्त ९ वर्षांची होती. तिचे खेळण्याबागळण्याचे दिवस होते. उन्हाळा असल्याने सुट्या होत्या. मस्त मौजमस्ती करावी, असे तिला वाटत होते. पण, कुलरचा शॉक लागल्याने तिच्या आयुष्याची दोरी तुटली.