Jalgaon Child Death : घरात झोका खेळत होती चिमुकली, खेळता खेळता झोका तुटला अन्…

कच्च्या विटांच्या घरावर लोखंडी पाईपाला साडीद्वारे केलेल्या झोक्यात तीनही मुली खेळत होत्या. खेळत खेळता अचानक साडीचा झोका तुटला. तसेच भिंतीच्या वीटा अंगावर पडल्या. या घटनेत अर्चना पावरा ही दीड वर्षाच्या बालिकेचा जागीच मृत्यू झाला.

Jalgaon Child Death : घरात झोका खेळत होती चिमुकली, खेळता खेळता झोका तुटला अन्...
घरात झोका खेळत होती चिमुकली, खेळता खेळता झोका तुटला अन्...Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 6:19 PM

जळगाव : घरामध्ये झोका खेळताना झोका (Swing) पडून भिंतीच्या विटा अंगावर पडल्याने दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू (Death) झाला तर दोन बालिका गंभीर जखमी (Injured) झाल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील सावदे येथे शनिवारी दुपारी ही हृदयद्रावक घटना घडली आहे. जखमी बालिकांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. अर्चना पावरा असे मयत बालिकेचे नाव आहे. मयत आणि जखमी तिन्ही मुली सख्ख्या बहिणी आहेत. मयत बालिकेवर सायंकाळी सावदे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने सावदे गावावर शोककळा पसरली आहे.

झोक्यात खेळत होत्या तिघी बहिणी अन् क्षणात होत्याच नव्हतं झालं

सावदे गावात धनसिंग शीला पावरा हे आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहेत. धनसिंग हे गेल्या 15 वर्षांपासून गावातील शेतकऱ्यांची शेती बटाईने करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी धनसिंग व त्यांची पत्नी हे शेतात गेले तर धनसिंगची आई व त्याच्या तीन चिमुकल्या मुलीच घरी होत्या. कच्च्या विटांच्या घरावर लोखंडी पाईपाला साडीद्वारे केलेल्या झोक्यात तीनही मुली खेळत होत्या. खेळत खेळता अचानक साडीचा झोका तुटला. तसेच भिंतीच्या वीटा अंगावर पडल्या. या घटनेत अर्चना पावरा ही दीड वर्षाच्या बालिकेचा जागीच मृत्यू झाला. तर तिच्या साडे तीन वर्षे व पाच वर्ष वयाच्या दोन्ही बहिणी गंभीर जखमी झाल्या. गंभीर जखमी दोघी बहिणींवर जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत अर्चना हिच्यावर सायंकाळी सावदे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. (A one and a half year old girl died due to swing broken in Jalgaon)

हे सुद्धा वाचा

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.