नववीच्या विद्यार्थ्याकडे आढळले पिस्टल, नामांकित शाळेसह परिसरात खळबळ

हा नवव्या वर्गातला मुलगा एका कर्मचाऱ्याचा असल्याचं समोर आलं आहे. त्याच्या वडिलांकडूनही या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे

नववीच्या विद्यार्थ्याकडे आढळले पिस्टल, नामांकित शाळेसह परिसरात खळबळ
Follow us
| Updated on: Jun 17, 2023 | 8:54 PM

प्रतिनिधी, जळगाव : शाळा हे सुरक्षित ठिकाण समजले जाते. शाळेत पोरगा गेला म्हणजे चार चांगल्या गोष्टी शिकून येईल, असं पालकांना वाटते. पण, भुसावळमध्ये एक खळबळजनक घटना घडली. एका नामांकित शाळेत विद्यार्थ्याकडे पिस्टल सापडली. ही पिस्टल त्याच्याकडे कुठून आली. याचा शोध पोलीस घेत आहेत. हा नवव्या वर्गातला मुलगा एका कर्मचाऱ्याचा असल्याचं समोर आलं आहे. त्याच्या वडिलांकडूनही या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. मुलाच्या हातात पिस्टल सापडलं. याचा जबाबदार कोण हेही लवकरच समोर येईल. पण, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

लाकडी मूठ असलेले पिस्टल

भुसावळ शहराजवळून तापी नदीच्या काठावर अकलूज शिवार आहे. या शिवारात असलेल्या एका नामांकित इंटरनॅशनल स्कूलमधील खळबळजनक घटना घडली. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांची अचानकपणे दप्तर तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडून दफ्तरात ॲल्युमिनियम या धातूचे आणि लाकडी मुठ असलेले पिस्टल आढळले.

हे सुद्धा वाचा

अल्पवयीन विद्यार्थी ताब्यात

शाळा प्रशासनाने ताबडतोब पोलिसांना ही माहिती दिली. फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोणवने यांनी सहकाऱ्यांसह येऊन हे पिस्टल जप्त केले. विद्यार्थी अल्पवयीन असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. शाळेचे मुख्याध्यापक ए. एच.शहा यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पिस्टल आले कुठून?

विद्यार्थी हा भुसावळ येथील रेल्वे कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. रेल्वे भागातीलच रहिवासी आहे. या घटनेने शाळेसह भुसावळ शहरात खळबळ उडालीय. या मुलाकडे हे पिस्टल आले कुठून ? त्याला ते कोणी पुरवली ? त्याने ते शाळेमध्ये का आणले ? याबाबतचा तपास पोलीस करीत आहेत. शाळेसारख्या पवित्र ठिकाणी आणि एका अल्पवयीन विद्यार्थ्याकडे पिस्टल आढळले. ही भुसावळ शहरातील पहिलीच घटना आहे. पोलीस विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.