दुःखार्थी वक्तव्याबाबत एकनाथ खडसेंना 70 फोन, महाजनांच्या टीकेमुळे कुटुंब दुःखसागरात…
माझ्या सुनेला मानसिक धक्का बसला असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेमुळे समाजासह मला अनेक लोकांचे या दुःखार्थी वक्तव्याबाबत 70 फोन आले आहेत.
जळगावः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांचा वाद विकोपाला गेला असतानाच महाजनांच्या टीकेमुळे आता खडसे कुटुंबीय भावूक झाले आहे. गिरीश महाजन यांनी त्यांच्या मृत्यूबाबत वक्तव्य केल्यानंतर एकनाथ खडसेंनी त्यांना प्रत्युत्तर देताना म्हणाले की, एवढ्या खालच्या पातळीवरचे राजकारण कधी झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. गिरीश महाजन यांनी त्यांच्यावर टीका केल्यानंतर ते म्हणाले की, माझ्या मुलाची हत्या झाली की आत्महत्या अशा स्वरूपाची खालच्या पातळीवर जाऊन गिरीश महाजन यांनी टीका केली.
त्यांच्या या टीकेमुळे आमच्या कुटुंबीयांवरच हा संशय घेण्यातील प्रकार असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले. ते म्हणाले की, या वक्तव्यामुळे आमच्या परिवाराला अत्यंत दुःख आणि वेदना झाल्या आहेत.
राजकीय दोषापोटी किती माणूस खाली जाऊ शकतो हे एक उदाहरण असल्याचे म्हणत त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर पलटवार केला.
गिरीश महाजन आमच्यावर टीका करतात कारण त्यांना सत्तेचा माज आला आहे. मात्र जनता ही मस्ती उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
गिरीश महाजन यांनी ज्या प्रकारे एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली आहे त्याच प्रकारे त्यांनी गिरीश महाजन यांच्यावरही जोरदार हल्लाबोल चढविला आहे. त्यांचे कृत्य मी उघड्या डोळ्यांनी पाहिले असल्याचे यावेळी खडसे यांनी सांगितले.
फरदापुरच्या रेस्टहाऊसमध्ये काय भानगड झाली होती. त्यामुळे ती भानगड वर्तमानपत्रातही चांगल्या चवीने रंगली होती. त्याचबरोबर गिरीशभाऊंचे किती प्रेमाचे संबंध लोकांशी आहे. तसेच महाजन यांनी केलेली ही वक्तव्यं ही नीच पातळीवरची लक्षणं असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
माझी चौकशी करायची असेल तर ते खुशाल करा, सीबीआय नाही तर वाटेल त्या प्रकारे चौकशी करा असंही त्यांनी जाहीर आवाहन गिरीश महाजन यांना दिले आहे.
त्यांनी ज्या प्रकारे खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे, त्या टीकेमुळे माझ्यासह माझी पत्नी, सून या त्यांचे अश्रू आवरता आले नाही असंही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
त्यांच्या या वक्तव्यामुळे माझ्या सुनेला मानसिक धक्का बसला असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेमुळे समाजासह मला अनेक लोकांचे या दुःखार्थी वक्तव्याबाबत 70 फोन आले आहेत.
आपण गेल्या 40 वर्षापासून सक्रिय राजकारणात आहे, मात्र इतक्या घाणेरड्या शब्दात आम्ही कधी राजकारण केलं नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.