Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report : एकनाथ खडसे आठ दिवसांपासून नॉट रिचेबल; जळगावात नव्या राजकीय घडामोडी?

एरवी एकनाथ खडसे कार्यकर्त्यांसाठी अर्ध्या रात्री सर्वकाळ फोनवर अगदी सहज उपलब्ध असतात. पण, एकनाथ खडसे काही दिवसांपासून गायब आहेत. त्यांचा फोन देखील लागत नसल्याची तक्रार सामान्य कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात आहे.

Special Report : एकनाथ खडसे आठ दिवसांपासून नॉट रिचेबल; जळगावात नव्या राजकीय घडामोडी?
एकनाथ खडसेImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 11:01 PM

जळगाव : सामान्य कार्यकर्त्यांसाठी सदा सर्वकाळ फोनवर अगदी सहज उपलब्ध असणारे एकनाथ खडसे आठ दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. नॉट रिचेबल येणे तर्कवितर्क जळगाव जिल्ह्यात सुरू झालेत. नव्या राजकीय घडामोडी तर घडणार नाही, ना अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) बडे नेते एकनाथ खडसे (Eknath khadse) यांचं वृत्त समोर आलं आहे. गेल्या ८ दिवसांपासून एकनाथ खडसे नॉट रिचेबल आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एरवी एकनाथ खडसे कार्यकर्त्यांसाठी अर्ध्या रात्री सर्वकाळ फोनवर अगदी सहज उपलब्ध असतात. पण, एकनाथ खडसे काही दिवसांपासून गायब आहेत. त्यांचा फोन देखील लागत नसल्याची तक्रार सामान्य कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात आहे.

पर्सनल दोन्ही फोन नॉट रिचेबल

एकनाथ खडसे यांचा गेल्या 8 दिवसांपासून कार्यकर्त्यांशी संपर्क झालेला नाही. असं पहिल्यांदाच घडल्याच घडतंय, अशीही माहिती समोर आली आहे. एकनाथ खडसे यांचे दोन्ही फोन नंबर्स नॉट रिचेबल असल्याचं समोर आलंय. राज्याच्या राजकारणात काही महत्त्वाची घडामोड समोर येतेय का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

एकनाथ खडसे आजारी?

दुसरीकडे एकनाथ खडसे मुंबईत असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र फोनवर संपर्क होऊ शकत नसल्याने जळगावातील त्यांचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी tv9 दिलेली माहिती अशी वडील सध्या आजारी असल्यामुळे ते आराम करत आहेत. याव्यतिरिक्त ते काही बोलल्या नाहीत.

कार्यकर्ते संभ्रमात

एकनाथराव खडसे हे कोणताही आडपडदा न ठेवणारे आणि रोखठोक भूमिका मांडणारे नेतृत्व म्हणून ओळखले जाते. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून जर त्यांचा फोन हा नॉट रिचेबल असेल तर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होणे साहजिकच आहे.

तब्येतीचे कारण असो अथवा राजकीय काही अडचण असो यातून कदाचित त्यांचा फोन नॉट रिचेबल असू शकतो. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आपण समजू शकतो.

LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी...
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी....
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं.
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा.
शेतकरी कर्जमाफीसाठी येवल्यात बैलगाडी मोर्चा
शेतकरी कर्जमाफीसाठी येवल्यात बैलगाडी मोर्चा.
अक्षय शिंदे प्रकरणात अपडेट, पोलिसांवर गुन्हा दाखल करा, कोर्टाचे आदेश
अक्षय शिंदे प्रकरणात अपडेट, पोलिसांवर गुन्हा दाखल करा, कोर्टाचे आदेश.
उन्हाळ्यात ट्रेकला जाताय तर थांबा, भर उन्हात ट्रेक करणं पडलं महागात
उन्हाळ्यात ट्रेकला जाताय तर थांबा, भर उन्हात ट्रेक करणं पडलं महागात.
जन्मदात्या आईनंच पोटच्या पोराला संपवलं, नांदेडमध्ये खळबळजक घटना
जन्मदात्या आईनंच पोटच्या पोराला संपवलं, नांदेडमध्ये खळबळजक घटना.
अमरावतीत मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन
अमरावतीत मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन.
लातूर मनपा आयुक्त मनोहरेंना एअर अ‍ॅम्ब्यूलन्सने मुंबईत आणणार
लातूर मनपा आयुक्त मनोहरेंना एअर अ‍ॅम्ब्यूलन्सने मुंबईत आणणार.