अजित पवारांकडून भरसभेत पंतप्रधान मोदींचं कौतुक; म्हणाले, त्यांच्याकडे पाहून…
Ajit Pawar on PM Narendra Modi And Giujrat Model : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव... गुजरातचा उल्लेख करत अजित पवारांकडून कौतुक. म्हणाले नरेंद्र मोदी म्हणजे व्हिजन असलेले पंतप्रधान... वाचा सविस्तर...
अमळनेर, जळगाव | 02 जानेवारी 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार आज जळगावमध्ये आहेत. अमळनेरमधील पाडळसे येथील निन्म तापी प्रकल्पाला अजित पवार यांनी भेट दिली. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत त्यांनी प्रकल्पाची पाहणी केली. तापी नदीवरील या प्रकल्पामुळे जळगाव सह इतर जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. यावेळी अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंडभरून कौतुक केलं. नरेंद्र मोदी म्हणजे व्हिजन असलेले पंतप्रधान, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार अंमळनेरमध्ये बोलत होते.
अजित पवार अंमळनेरमध्ये…
धुळे आणि जळगाव जिल्यात पाडळसे प्रकल्पामुळे फायदा होणार आहे. या प्रकल्पाला निधी कमी पडू देणार नाही. सर्वसाधारण माणसाला समोर ठेऊन कालचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. शेतकऱ्याला डोळ्यासमोर ठेऊन कालच्या अर्थसंकल्प मांडला गेला आहे. मोदीजी म्हणजे व्हिजन असलेले पंतप्रधान आहेत. गुजरातचंही कौतुक… पाण्याचे वाटप करतांना कोणत्या राज्य किती पाणी द्यायचे यावर चर्चा सुरू आहे. अनेक प्रकारचे प्रकल्प मार्गी लावले आहेत. कुठलाही भागातील कुणीही वंचित राहणार नाही. विविध विकास कामांमुळे बदल होऊन जगात आपल्या पंतप्रधानांकडे पहिलं जातं, असं अजित पवार म्हणाले.
नरेंद्र मोदींचं कौतुक
सरकार गरीबाच्या गरीब माणसांना घरं देत आहे. अमळनेरला अनिल भाईदास पाटील यांना निवडून दिल्याने आम्ही त्यांना मंत्री केलं. वाचाळवीर भरपूर अजून त्यांच्याकडे लक्ष देऊन नका. वेगळ्या दिशेने महाराष्ट्र नेऊन जाण्यासाठी काम करतोय. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वला साथ देत लोकसभेला मदत करा आणि विधान सभेला देखील आम्हाला मदत करा, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
निधी कमी पडू देणार नाही- अजित पवार
पाडासे धरणाची काय स्थिती आहे हे पाहण्यासाठी आलोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्ही सुधारीत योजनेची मान्यता दिली. 4 हजार एकर भू – संपादन घेण्यात येणार आहे. केंद्र सरकारचा पैसा यात आणून फायद्याच होईल. 5 हजार कोटी रुपये एका धरणाला देऊ शकणार नाही. गोसेखुर्द प्रकल्पाप्रमाणे हे प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प करता येतो का हे देखील आम्ही बघणार आहोत, असं अजित पवार म्हणाले.